जालना जिल्हा

आशा वर्कर्स ही आरोग्याची नवसंजीवनी-सौ.किर्ती उढाण


जालना- आशा वर्कर्स ह्या नागरिक व आरोग्य यंत्रणेचा दुवा असून आरोग्याची नवसंजीवनी असलेल्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांची सरकारने दखल घेण्याची गरज जालना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. कीर्तीताई उढाण यांनी आज ( ता. २१) येथे विशद केली.
आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटना यांच्यावतीने आयोजित आशा- गटप्रवर्तक सहानुभूती मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी जालना जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विचार मंचावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कक्ष अधिकारी मांटे, आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काॅ. गोविंद आर्दड,सचिव श्रीमती मीना भोसले आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना सौ. उढाण पुढे म्हणाल्या की, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचे कार्य हे आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असते, जनतेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी जसी आरोग्य यंत्रणा कार्यरत असते , आशा वर्कर्स व गटप्रवर्तकदेखील आरोग्य यंत्रणेप्रमाणे कार्यरत असतात. कमी मानधनावर कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या समस्या, प्रश्न सरकारने जाणून घेणे गरजेचे आहे. आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांविषयी आपणास सहानुभूती आहे, त्यांचे प्रश्न निकाली लागावेत,यासाठी आपण पुढाकार घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासनही सौ. उढाण यांनी यावेळी दिले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर म्हणाले की, आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या समस्या व प्रश्नांची आपणास जाणीव आहे. आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचे आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेले प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार
आहोत.
यावेळी मार्गदर्शन करतांना आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काॅ. गोविंद आर्दड यांनी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांची सरकारने सोडवणूक करावी, अशी मागणी केली. आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी कोवीड महामारीत उलेखनीय असे कार्य केले आहे. त्यांना समाधानकारक मोबदला मिळाला नाही. आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, त्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणीही काॅ. आर्दड यांनी यावेळी केली.
या मेळाव्याचे प्रास्ताविक आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सचिव श्रीमती मीना भोसले यांनी केले. संचलन रेणुका तिकांडे यांनी तर आभार प्रदर्शन मंदाताई तिनगोटे यांनी केले.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रेखा सपकाळ, कल्पना आर्दड, संगिता निर्मल, पार्वती पुंजारे, दीपा रगडे, नीता बोराडे, सुमित्रा पिंपळे, अर्चना सोसे,उमेश मुंदडा, दिगंबर शिंदे, आशा जोगदंडे,गंगा अंभोरे, अंजली मुठ्ठे आदींनी परिश्रम घेतले.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!