घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
‘समृद्धी’ चा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथील समृद्धी शुगर साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदिपन व मोळी पूजनाचा कार्यक्रम गुरूवार (२७) रोजी सभासद शेतकरी भाग्यश्री ढवळे,शारदा गाडेकर शकुंतला टोळे,पार्वती तौर यांच्याहस्ते पार पडला.
यावेळी चेअरमन सतिष घाटगे यांनी बोलताना सांगितले की, येणाऱ्या हंगामामध्ये समृद्धी शुगर कारखान्याच्या माध्यमातून दररोज ५ हजार मेट्रिकप्रमाणे शेवटपर्यंत १० लाख मेट्रिक टन गाळप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन महेंद्र मेठी,वैशालीताई घाटगे,साडगाव संस्थानचे रामदासी महाराज, किरण खरात, जीवन वगरे,संचालक रणजित उढाण, दिलीप फलके, विकास शिंदे,शेखर सोळंके, मुख्य शेतकी अधिकारी अमोल तौर, यांच्यासह उस उत्पादक शेतकरी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.