कुंभार पिंपळगावात गोळीबार झाल्याने उडाली खळबळ ,किराणा दुकानदारावर झाला पिस्तूलातून गोळीबार

कुंभार पिंपळगावात,/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानदार यांच्यावर अज्ञात इसमाने पिस्तूलातून गोळीबार केल्याची घटना दि.२७ आक्टोंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.दरम्यान या घटनेमुळे गाव व परीसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कुंभार पिंपळगावातील अंबड पाथरी मुख्य रस्त्यावरील मार्केट कमिटीच्या गाळ्यात आनंद किराणा दुकानात दुकानदार आदेश पांडूरंग चांडक वय (२६) हे रात्रीच्या सुमारास दुकानात असताना अज्ञात दोन इसमाने गल्ल्यातील रक्कम दे म्हणत पिस्तूलातून गोळी झाडली.यात दुकानदार चांडक यांच्या हातातील पंजावर पिस्तूलातून गोळी झाडून अज्ञात इसमाने तेथून पलायन केले.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन,पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी फौजवाट्यासह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.व नागरीकांचा जमाव हटविला.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे करीत आहे.