ग्रामपंचायतीवर सत्ता परीवर्तनासाठी थेट मुख्यमंत्री ना.शिंदे यांना पाठविला पत्र
न्यूज जालना/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील ग्रामपंचायतीवर मागील गेल्या ३५ वर्षांपासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे.धनशक्तीच्या प्राबल्यावर सत्ता काबीज ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवरील नेते यशस्वी ठरत आहे.ही सत्ता मोडीत काढण्यासाठी व निवडणूक लढविण्यासाठी विरेगव्हाण तांडा (ता.घनसावंगी) येथील शिवसैनिक जालिंदर पवार यांनी चक्क राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांना पत्र पाठविले आले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांने नमूद केले आहे की,सन १९८५ वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालणारा सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कार्यकर्ता आहे.८० टक्के व २० टक्के राजकारण या सुत्रानूसार मी पक्षसंघटन वाढीसाठी आजतागायत काम करीत आहेत.येथील स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धनशक्तीचा प्रचंड प्रमाणात वापर होत असून धनशक्ती विरूद्ध जनशक्तीचा पराभव होत असल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांच्या मनात रुजविण्यासाठी व स्थानिक ग्रामपंचायतीवर बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा भगवा झेंडा फडकविण्यासाठी सहकार्य करावेत असे भावनिक आवाहन करीत चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.यावर मुख्यमंत्री या पत्रावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.