पवन दशरथ व यशराज डेंगळे यांना अभिनव गुणवत्ता सन्मान
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित १७ व्या व १८ व्या बालनाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेते बालकलावंतांचा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव प्राथमिक फेरीचा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ ३१ ऑक्टोबर २०२२रोजी तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सुंदरेश्वर बहु उद्देशीय सेवाभावी संस्था गुंज,(कुं .पिंपळगाव) ता.घनसावंगी संचलित आयुष अकॅडमी ऑफ परफार्मिंग आर्टस व संत रामदास महाविद्यालयाचा यशस्वी विद्यार्थी कलावंत पवन दशरथ व आयुष अकादमीचा विद्यार्थी यशराज डेंगळे यांना हरिदास घुंगासे लिखित आणि प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका टेकडीची ‘या बालनाट्यातील भूमिकेसाठी “अभिनय गुणवत्ता पारितोषिक” देऊन गौरविण्यात आले.
सुंदरेश्वर बहु उद्देशीय सेवाभावी संस्था गुंज, संचलित आयुष अकॅडमी ऑफ परफार्मिंग आर्टस यांच्या माध्यमातून संचालक प्रसिद्ध रंगकर्मी हरिदास घुंगासे विशेष प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासमवेत कलावंत रघु ताठे, किशोर साबळे, रामेश्वर नरवडे,किसन भोईटे, महेंद्र वाहूळे,नंदू वाघमारे ,संघराज वाघमारे
हे ग्रामीण भागातील विद्यार्थी कलावंतांना घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आयुष अकॅडमी ऑफ परफार्मिंग आर्टस( कु.)पिंपळगाव यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.अकादमीत अभिनय-नृत्य-गायन-वादन-चित्रकला आदींचे प्रशिक्षण दिले जाते. विविध महोत्सवांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.अभिनय गुणवत्ता सन्मान प्राप्त अभिनेता पवन दशरथ सध्या संत रामदास महाविद्याल,घनसावंगी येथे प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे ,डॉ. राजू सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल आयुष अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस् व संत रामदास महाविद्यालयाचा विद्यार्थी पवन मोहन दशरथ व आयुष अकादमीचा विद्यार्थी यशराज आसाराम डेंगळे यांचे कुं पिंपळगाव, गाव परिसरा सह तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे, ग्रामीण भागातील बालकलावंतांना बालरंगभूमी वर काम करण्याची संधी आयुष अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ने उपलब्ध करून दिल्याबद्धल पालकांनी समाधान व्यक्त केले स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. शिवाजीराव चोथे,उपाध्यक्ष डॉ. संभाजी चोथे, सचिव विनायक चोथे ,प्राचार्य डॉ. आर. के. परदेशी ,उपप्राचार्य प्रा. प्रमोद जायभाये,प्रा. भगवान मिरकड, तुळशीदास घोगरे ,गोरख चोथे ,डॉ. सचिन संगेकर ,लेखक राजकुमार तांगडे,अभिनेता संभाजी तांगडे, शाहीर संभाजी घोगरे,शाहीर अरविंद घोगरे, किशोर उढाण आदींनी अभिनंदन केले आहे.