घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

थेट जनतेतून सरपंच पद,गावागावांत चुरस

न्यूज जालना/प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी :३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर

तालुक्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवार (दि.९) रोजी जाहीर केला आहे.यात तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीचा समावेश असून थेट जनतेतून सरपंच होणार असल्याने लवकरच गावगाड्यावरील नि्डणूकीची रणधुमाळी रंगणार आहे.मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत चूरस होणार आहे.
तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूका असून यामध्ये मोठी चूरस निर्माण होणार असून सर्वच पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांकडून आपलेच वर्चस्व ग्रामपंचायतीत राहावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.तालुक्यातील बोलेगाव,घाणेगाव,डहाळेगाव,सिद्धेश्वर पिंपळगाव, मोहपूरी,दैठणा बु,दैठणा खुर्द,चापडगाव,अंतरवाली राठी,गाढेसावरगाव अरगडेगव्हाण,पिरबॅगवाडी,मुर्ती,कुंभार पिंपळगाव,तळेगाव, पांगरा, भोगगाव,शिवणगाव,उक्कडगाव,भेंडाळा,विरेगव्हाण तांडा,दहीगव्हाण बुद्रूक,राणीउंचेगाव, मानेपूरी,मंगूजळगाव,भादली,श्रीपत धामणगाव,बाणेगाव,शेवता,हातडी,कोठाळा बुद्रूक,वडीरामसगाव,लिंबी,पिंपरखेड बु.या गावांचा समावेश आहे.
या ग्रामपंचायतीच्या इच्छूक कार्यकर्त्यांकडून सरपंच व सदस्य पदासाठी चाचपणी सुरु केली आहे.आपला पॅनलचा उमेदवार कसा सक्षम राहिल याची आखणी केली जात आहे.उमेदवारी अर्जासोबत शौचालय, बेबाकी,अपत्य, जातपडताळणी प्रमाणपत्र अथवा प्रस्ताव दाखल केलेली पावती गुन्हेगारी बाबत माहिती,अर्ज दाखल केलेला प्रभाग,तेथील आरक्षित जागा आदीबाबत माहिती कशी भरायची याबाबत आतापासूनच घेण्यात येत आहे.सरपंचपदासाठी मोठी चुरस रंगणार असून सर्वसाधारण पदासाठी ज्या गावात आरक्षण आहे तेथे रस्सीखेच होणार आहे.दरम्यान गावपातळीवरील निवडणूका जाहिर झाल्याने गावातील राजकीय पुढारी कामाला लागले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!