घनसावंगी तालुका
घनसावंगी तालुक्यात रोजगार हमीची कामे चालू करा : नसीर शेख
जालना प्रतिनिधी :
घनसावंगी तालुक्यामध्ये गेले अनेक दिवसापासून ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत रोजगार हमीची कामे बंद आहे ती लवकरात लवकर चालू करण्यात यावी.रोजगार हमी योजने अंतर्गत,विहीर, वृक्ष लागवड, शेततळे, गोठा,घरकुल इत्यादी कामे शेतकऱ्यांसाठी खुप गरजेचे आहे, मजुरांना रोजगार नाही,वरील योजना राबवल्या मुळे खुप शेतकऱ्यांना फायदा देणार आहे.त्यांची आर्थिक प्रगती होऊ शकते, म्हूणन ह्या योजना घनसावंगी तालुक्यात तात्काळ सुरु करावे अशी मागणी लोकमंगल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नसीर शेख यांनी निवेदणाद्वारे गटविकास अधिकारी यांच्या कडे केली आहे, यावेळी भरत परदेशी भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस, परमेश्वर सोनवणे भाजप नेते,राज कुमार उगले सरपंच,अभिमान गुडेकर, संतोष थोरात, विकास मते, शेख बशीर आदी उपस्थित होते.