साधना केल्याने जे पुण्य साधकाला मिळते, तेच पुण्य साधकाची सेवा केल्याने प्राप्त होते – प पू गोवत्स राधाकृष्णजी महाराज
मानसिंग बोराडे / मंठा तालुका प्रतिनिधी :.
– श्रीमद् भागवत कथेच्या पाचव्या दिवशी पूज्य राधाकृष्ण महाराजांनी कृष्ण जन्माचा प्रसंग सांगताना म्हणाले की, जेव्हा भगवान कृष्णाला नंदबाबा गोकुळात घेऊन आले, तेव्हा, सर्व चराचर आनंदमग्न झाले. नंदबाबांनी मूलप्राप्तीसाठी कोणतेच नवस, अनुष्ठान, जप-तप काहीच केले नाही ,तरीही, भगवान बालकाच्या रूपात येथे अवतरले, मनुष्याचे व्यक्तिमत्व किंवा सौंदर्य त्याच्या रंगरूपात नसून त्याच्या गुणांवर अवलंबून असते. याचा महाराजांनी पुढील दृष्टांत दिला. एका चित्रकाराने लहानपणी अत्यंत स्वरूपवान मुलाला पाहून त्याचे चित्र काढले, कालांतराने चित्रकार ते विसरले, परंतु, अचानक त्यांच्या मनात सर्वात क्रूर हिंसक माणसाचे चित्र काढण्याचे विचार आले, आणि कैदखान्यातील कैद्यांना बोलावले,
कैद्याने असे चित्र काढायचे कारण विचारले असता, त्याला सुंदर बालकाचे चित्र काढल्याची आठवण झाली, तेव्हा चित्रकाराने बालपणीची निरागस व प्रेमळ मुद्रा आणि प्रतिकूल परिस्थितील मुद्रा यातील फरक समजावण्यासाठी उद्देश सांगितला, त्या बालकाचे चित्र पाहताच कैदी ढसाढसा रडू लागला, रडण्याचे कारण विचारल्यावर कैद्याने ते चित्र त्याच्या बालपणाचे असल्याचे सांगितले. तात्पर्य असा की माणसाच्या मनावर वातावरणाचा परिणाम होतो, लहानपणी बालकाला आई-वडिलांनी चांगले संस्कार केले तर त्याचे फळ चांगले मिळते, म्हणून बालकावर लहानपणीच संस्कार करावे असे ते म्हणाले. कामनायुक्त व्यवहाराने माणसाला योग्य फळ मिळत नाही, नंदबाबाने कोणतीच कामना केली नाही, म्हणून त्यांना असे पुत्ररत्न प्राप्त झाले. मंठा येथे जोशी कुटुंबात जन्मलेले परंतु लहानपणीच वैराग्य वृत्तीने मौनी बाबाच्या सेवेत समर्पित झालेले, सध्याचे दत्तधाम नाशिकचे प पू दत्तदास महाराज यांचे आजच्या कथेला आगमन झाले, याचा उल्लेख करीत महाराजांनी अशा पवित्र साधू संतांच्या आगमनाने हा परिसर पवित्र झाला आणि आपणही सर्व धन्य झालोत असे म्हणाले, या कथेला प पू बालयोगी गंगेश्वर महाराज सोमेश्वर महादेव मंदिर मदनापूर कथा श्रावणाला उपस्थित होते. आज कृष्ण जन्म निमित्ताने रामकृष्ण हरि प्रभात फेरी मंडळातील राजस्थानी समाजातील व सर्व समाजातील महिलांनी छप्पन भोगाचा प्रसाद तयार केला व तो भक्तांना वितरित केला. कथा सप्ताहात कीर्तनाच्या महाराजांचे यजमानपद भूषविणाऱ्या सन्माननीय दात्यांचे, शोभायात्रेत सहभागी शाळा प्रमुखांचे, व किर्तन भोजन प्रसादाचे यजमान यांना महाराजांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले. कथेला हरे कृष्ण सत्संग समिती जालनाचे किशोरजी तिवारी व सर्व पदाधिकारी, मा आ सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे, भाऊसाहेब गोरे, सतीशराव झोल, उदयदादा बोराडे, दत्ताभाऊ बोराडे,गजानन कापसे,गणेश बोराडे, अनुप अग्रवाल, अंकुशराव (आबा) बोराडे, मोहन आढे,लिंबाजी बोराडे, प्रभाकर सुरवसे, विलास आकात, नरेंद्र पवार, शिवाजीराव सुरवसे,अमोल विरकर बसवराज शिवणकर, शिवाजी बोराडे, गणेश बोराडे, यासह कथा श्रवणाला अनेकांची उपस्थिती होती…