घनसावंगी नगरपंचायत येथे अग्नीशमण वाहनांचे लोकार्पण संपन्न
घनसावंगी नगरपंचायत येथे अग्नीशमन वाहनांचे लोकार्पण संपन्न. घनसावंगी प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याचे मा.आरोग्यमंत्री मा.आ.श्री. राजेश भैय्या टोपे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या अग्निशमन गाडीचा लोकार्पण सोहळा दि.१७ रोजी पार पडला.महाराष्ट्र राज्याचे मा.आरोग्यमंत्री तथा आमदार मा.आ.श्री. राजेश भैय्या टोपे साहेब यांच्या हस्ते या अग्निशमन गाडीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी नगरपंचायतीच्या वतीने व घनसावंगी शहाराच्या वतीने मा.साहेबांचा सत्कार करण्यात आला.मा.साहेबांच्या सततच्या पाठपुरावा व प्रयत्न मुळे नगरपंचायत घनसावंगीला अग्निशमन गाडी व केंद्र मंजूर झाले.ग्रामीण तसेच शहरी भागात आपत्ती व्यवस्थापन करणे साठी ही गाडी महत्वाची भूमिका बजावणार आहे. सुरुवातीला गाडी घनसावंगीला उपलब्ध नसल्याने अंबड किंवा परतूर येथून गाडीला बोलवावे लागत होते.नगर पंचायत अंतर्गत खरेदी केलेल्या या अग्निशमन गाडीने शहराला व ग्रामीण भागाला आपत्ती काळात मोठा फायदा होऊ शकतो आणि आपत्तीत उदभवणार्या परिस्थितीत लवकर मात करू शकतो परिणामी होणारी जीवितहानी व नुकसान टाळले जाऊ शकतात. नक्कीच या अग्निशमन गाडीने शहरात व ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती,आग लागणे व इत्यादी नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल. घनसावंगी नगरपंचायत अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रु 1 कोटी इतक्या रकमेचे अग्निशमन वाहनाच्या लोकार्पनाचा सोहळा आज दिनांक 17.11.2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. आरोग्यमंत्री मा.श्री राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित.नगराध्यक्ष श्री पांडुरंग कथले मा.उपनगराध्यक्ष मुमताजभाई शेख सभापती यशवंतराव देशमुख, सभापती गणेश हिवाळे, सभापती गफ्फुरभाई सय्यद नगरसेवक विघनहर राठोड, जमील भाई सौदागर, नवाब भाई सय्यद, मिलिंदराव काळे, नितीनराव गायकवाड, प्रल्हाद नाईक, सुनील तारगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री नंदकुमार देशमुख, प्रभाकर धाइत, बापुराव देशमुख,ऍड राजेश्वर देशमुख, नयूम भाई ,अहेमद सय्यद, जाकेर मौलाना,मा.नगरसेवक सतीश चवहन कैलास पवार पाचू शहा अब्दुल रहीम कुरेशी मोतिसेठ, लतिफ भाई, अशोक सोमवारे,प्रभाकर देशमुख,रामजी लोंढे, जब्बारभाई शहा,सय्यद अनिस,लहाणू खरात,विठ्ठल काळे, चंद्रकांत तिडके, संतोष तारगे,बाबू काळे, राहुल काळे, अफसर शेख, अफजल शेख, नय्युंमभाई शेख,नगर पंचायत कर्मचारी श्री ज्ञानेश्वर फुने, प्रकाश पितळे, विशाल मढवई, ज्ञानेश्वर सोमवारे, राजू भरस्कार, मेहबूब शेख, सुरेश खंदारे, राजू वजीर, अशपक शेख, कांता सोमवारे, बाळू बिडवे, अन्वर सय्यद, विष्णू कदम, इत्यादी उपस्थित होते