घनसावंगी तालुकाजालना क्राईम

तीर्थपुरीत सशस्‍त्र दरोडा; महिलेला मारहाण करून ४० तोळे सोने लुटले


तीर्थपुरी : जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे उल्हासराव पवार यांच्या घरी (खिडकीचा मळा) आज (शुक्रवार) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सशस्‍त्र दरोडा पडला. यामध्ये पती- पत्नीला मारहाण करून जवळपास ४० तोळे सोने लंपास करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

images (60)
images (60)

या विषयी अधिक माहिती अशी की, तीर्थपुरी येथील खिडकीचा मळा येथील उल्हासराव पवार यांच्या घरी आज (शुक्रवार) मध्यरात्री दोन वाजता सात ते आठ दरोडेखोरांनी प्रवेश केला. घरात उल्हासराव पवार पती- पत्नी झोपले होते. यावेळी त्यांच्या घराच्या कड्या दरोडेखोरांनी लावल्या. कडी लावल्याचा आवाज आल्याने उल्हासराव पवार यांना जाग आली. त्यानी बाजूच्या घरात झोपलेले त्यांचे लहान बंधू सुरेश पवार यांना आवाज दिला असता, ते उठून घराच्या बाहेर आले. दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करून पत्नीला मारहाण केली.

पत्नीच्या हातातील सोन्याची बांगड्या व अंगठ्या व कपाटातील सोन्याचा ऐवज असा एकूण 40 तोळे सोने लंपास केले. यावेळी दरोडेखोरांनी बाजूच्या घराच्या कड्या लावल्या होत्या. त्यांच्या घराच्या बाजूला शेत असल्याने या ठिकाणाहून दरोडेखोर आले असावेत. असा कयास लावला जात आहे. घरात जवळपास वीस मिनिटे चोरांनी धुमाकूळ घातला. सुरेश एकनाथ पवार यांना मारहाण झाली असून, त्यांच्या बोटाला जमख झाली. त्यांची पत्नी अनुराधा सुरेश पवार यांना दरोडेखोरांनी डोक्यात काठी मारल्‍याने त्‍या जखमी झाल्‍या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांनी घटनास्थळी भेट देऊन वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या विषयी माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सुभाष भुंजग, महाजन, गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी भेट दिली. यावेळी फिंगर प्रिंट व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!