घनसावंगी तालुकाजालना क्राईम

तिर्थपुरी दरोडा प्रकरणी तीन पथकाद्वारे तपास


जालना:
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे शुक्रवारी पहाटे पवार दापत्याला मारहाण करून तब्बल 35 तोळी सोने लुटून नेण्याची घटना घडली. या प्रकरणी तीन पोलीस पथकाद्वारे तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले

images (60)
images (60)

तिर्थपुरी येथील उल्हास पवार व त्यांची चार बंधू हे तीर्थपुरी परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखली जातात त्यांच्या घरी शुक्रवारी पहाटे सात ते आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकला यावेळी बंधू सुरेश पवार व त्यांच्या पत्नी अनुराधा पवार यांना मारहाण करून सोन्याचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ दखल घेत पहाटे चार वाजल्यापासून तपासास सुरुवात केली या प्रकरणी एलसीपी चे दोन पथक व पोलिसांचे एक पथक तपास काम करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजग यांनी सांगितले
दरम्यान या दरोडेच्या घटनेने तीर्थपुरीसह परिसरात दहशत पसरली असून दरोडेखोरांचा तपास लवकरात लवकर लावावा अशी मागणी होत आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!