जिल्हा क्रीडा कार्यालय,जालना.यांच्या वतीने मूर्ती येथे तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धा संपन्न.
जालना:- जिल्हा क्रीडा कार्यालय,जालना.यांच्या वतीने मूर्ती.येथे तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे उदघाटन संपन्न व स्पर्धेस सुरुवात.
दिनांक 21 नोव्हेंबर पासून 2 दिवशीय तालुका स्तरीय खो खो स्पर्धला सुरवात करण्यात आली आहे
ही स्पर्धा घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथे शरदचंद्रजी पवार विधालायल येथे सुरू असून ह्या स्पर्धेत 14वर्ष ,17वर्ष,व 19वर्ष वयोगटातील, पहिल्या दिवसी मुलांच्या खो-खो क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक संतोषराव वाबळे,तालुका क्रीडाधिकारी, घनसावंगी.तर अध्यक्ष म्हणुन रवींद्र तात्या तौर,अध्यक्ष -सूर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ कु.पिंपळगाव.हे होते.तसेच भागवतराव कडुळे,तालुका क्रीडा संयोजक, संतोषराव आनंदे व रामेश्वरआर्दड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातिला दीप प्रज्वलन व सरस्वतीचे पूजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक, अध्यक्ष व क्रीडा संयोजक यांनी उपस्थितांना अमुल्य असे मार्गदर्शन करुन,स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर 14,17 व 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या खो -खो क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये 14 वर्ष वयोगटातुन,जि.प.प्राथमिक शाळा,मासेगाव. 17वर्ष वयोगटातुन,शरदचंद्रजी पवार मा.विद्यालय,मूर्ती.व 19 वर्ष वयोगटातुन,सरस्वती भुवन मा.विद्यालय,राजंणी या शाळेने प्रथम क्रमांक पटकावले.या सर्व विजयी संघाचे,संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तात्या तौर,सचिव सौ.किरणताई तौर,संचालक .डॉ सुरजसिंग तौर,तालुका क्रीडाधिकारी संतोषराव वाबळे,संयोजक भागवतराव कडुळे,गुंज केंद्राचे केंद्र प्रमुख सोळंके बी.एन.,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी कर्हाडे व्ही.पी.विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके,क्रीडा शिक्षक शिवहरी कायंदे यांनी अभिनंदन केले.या स्पर्धेत 12 शाळेतील खेळाडू व क्रीडाशिक्षक यांनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे सुञसंचलन सहशिक्षक भिमाशंकर शिंदे यांनी केले तर सहशिक्षक विष्णू भाबट यांनी आभार मानले.