देशाचे हितासाठी विचार करणारे एकमेव वफादार रयतेचे राजे ह.टिपू सुलतान – अब्दुल्लाह चतुर्वेदी
मानसिह बोराडे/ मंठा
(व्याख्यानाचे कार्यक्रमाला मंठेकरांचा मोठा प्रतिसाद)
मंठा प्रतिनिधी,येथे हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित भव्य व्याख्यानाचा कार्यक्रमाचा आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 23 नोहंबर 2022 बुधवार रोजी रात्री 8 .00 वा आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाची तयारीसाठी सकाळ पासुन धावपळ सुरू होती. सर्व समाजातील लोकांनी कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.याकार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण, आणि हजरत टिपू सुलतान यांचे जिवनीवर आधारित तराना वाचन करून करण्यात आली . कार्यक्रमात व्याख्यानकार , भारतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, निर्भीड,बुलंद आवाज, हक्क आणि न्यायप्रेमी हजरत मौलाना अब्दुल्ला सालेम साहब चतुर्वेदी अररिया, सीमांचल, हे लोकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, – — हजरत टिपु सुलतान विज्ञानवादि होते हजरत टिपू सुलतान यांना विज्ञानाचे ज्ञानहोते त्याप्रमाणे आज घडिला मुस्लिम बांधवांनीही आपल्या मुलांत शिक्षणाची गोडी निर्माण करुन शासनाच्या मुख्य प्रवाहात यावे आपण सर्व मुस्लिम समाजाने मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करुन शासनाच्या मुख्य प्रवाहात यावे- असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक हजरत मौलाना आजहर साहेब काश्फी तर प्रमुख अतिथी म्हणून मौलाना कारी अनजर साहेब , मोईनोद्दीन खान साहब व बाहेर गावाहून आलेले व शहरातील सर्व उलेमा व हुफ्फाज ईकराम यांची प्रमुख उपस्थित होती.पुढे बोलताना मौलाना अब्दुल्ला म्हणाले जगातील एकमेव असे रयतेचे राजे जे की कृषी क्षेत्रातील ,आरोग्य क्षेत्रातील तसेच वैज्ञानिक क्षेत्रातील देशाच्या हितासाठी विचार करणारे युद्धा आणि अल्लाहचे वफादारासहित देशाचाही वफादार एकमेव असे युद्धा हजरत टिपू सुलतान हे महान राजे होते. असे ते शेवटी म्हणाले,या भव्य कार्यक्रमात मंठा शहरातील राजकीय मंडळी,नगरसेवक ,सामाजिक कार्यकर्ते वारकरी मंडळी,तसेच सर्व समाजातील लोकांनी बहुसंख्येने सहभाग नोंदविला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेरे -ए -हिंद हजरत टिपु सुलतान रहे युवा मंचची टिमने परीश्रम घेतले.