जालना क्राईमजालना जिल्हा

जालन्यात देण्याघेण्याच्या वादातून मित्रानेच केला मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला

जालन्यात देण्याघेण्याच्या वादातून मित्रानेच केला मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला

images (60)
images (60)

जालना प्रतिनिधी :-

जुना जालन्यातील नॅशनलनगर येथील शेख रहीम आणि मुजाहेद अहमद शेख हे दोघे मित्र असून, त्यांच्यात पैसे देण्या-घेण्याचा वाद आहे.28 नोव्हेंबर रोजीच्या सांयकाळी मुजाहेद शेख यास घरातून आपण औरंगाबाद चौफुलीवर चहा घेण्यासाठी जाऊत, असे म्हणून शेख रहीम याने बोलावून घेतले होते.

मुजाहेद याच्या मोटारसायकलवर शेख रहीम गेले होते, यावेळी मुजाहेदचा 5 वर्षाचा मुलगाही सोबत होता.यावेळी शेख रहीम याने मुजाहेद याच्यावर अचानक चाकूने हल्ला केला व पोटात भोसकले. यामध्ये गंभीर जखमी अवस्थेत मुजाहेद यास औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे फिर्यादी होऊन आरोपी शेख रहीम याच्याविरुद्ध भादंवि. 307 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक देविदास सोनवळे हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!