मंठा तालुका

१३ सदस्यांसाठी ५० उमेदवार रिंगणात ; तळणीत सरपंच पदासाठी प्रतिष्ठा पणाला !

images (60)
images (60)

मंठा तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीची निवडणूक रंगणार

तळणी: मंठा तालुक्यातील तळणी ग्रामपंचायत निवडणूक नेहमीच चुरशीची व लक्षवेधी ठरत आली आहे. गत निवडणूकीप्रमाणे याहीवेळी जनता गावचा सरपंच निवडणार आहे. तळणी ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. त्यात गतवेळी निवडणूक जिंकुनही सरपंचपद राखता न आल्याने भाजपने यंदा आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची घाई सुरू झाली असून, २ डिसेंबर रोजी सरपंच पदाच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. सरपंचपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

तळणी ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. गावची सत्ता मिळवण्यासाठी भाजप पुरस्कृत पॅनल आणि बहुजन विकास आघाडीच्या पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे. सरपंचपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यातील काहींना ग्रामस्थांची पसंत आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच निवडप्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी बहुजन विकास आघाडी पुरस्कृत पॅनलने सरपंच पदासह ५ जागांवर विजय मिळविला होता. या पॅनलचे प्रमुख उद्धवराव पवार यांना मागील निवडणूकात अजिंक्य राहिले आहे. यंदा भाजपासह इतर पॅनलचे कठवे आव्हान त्यांच्या पॅनलसमोर असल्याने ते सत्ता कायम राखणार की परिवर्तन होणार, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपा पुरस्कृत पॅनलसह व इतर नेतृत्वाकडून उमेदवार शोधून पॅनल निर्माण करण्यासाठी धावपळ सुरूच आहे.

७ जागांवर निवडुन येणार महिला …

जनतेचा कौल आपल्या बाजुने वळवण्यासाठी पॅनलप्रमुख कामाला लागले आहे. त्यात कोण बाजी मारतो हे येत्या काळात स्पष्ट होईल. निवडणुकीत एकुण ५ वार्डात सरपंचपदासह १३ जागांसाठी तब्बल ५० उमेदवार तयारीला लागले आहे. यातील ७ जागा विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत. ही संधी साधत महिला उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!