शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने शरद महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
कुंभार पिंपळगाव :
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सुर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ कुंभार पिंपळगाव यांच्या वतीने शरद महोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला
कुंभार पिंपळगाव येथील शरदचंद्रजी पवार उच्च माध्यमिक विद्यालय, गोदावरी पब्लिक स्कुल व शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा कुंभार पिंपळगाव येथे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शरद महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष रविंद्र तौर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य जालना हे होते तर उद्घाटक म्हणून डॉ.निसार देशमुख जालना जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय वाघचौरे जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनिरीक्षक हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून नंदकुमार देशमुख तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घनसावंगी, संस्थेच्या सचिव किरणताई तौर,संस्थेचे उपाध्यक्ष धिरजसिंह तौर,असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर बॉक्स कंपनी लंडन, नाटककार राजकुमार तांगडे, सोमनाथ नरके सहाय्यक पोलीस निरीक्षक घनसावंगी, संतोष मरळ पोलीस उपनिरीक्षक कुंभार पिंपळगाव,विजयकुमार तौर सरपंच शिवनगाव, परमेश्वर तौर सरपंच उक्कडगाव, संगीताताई गंगाधर लोंढे सरपंच कुंभार पिंपळगाव हे होते तर सिद्धार्थ गाडे,पल्लवीताई तौर,वंदनाताई तौर, निमाकाकी तौर, मजहर पठाण,मतीन शेख,मधुकर ढवळे,भरतकाका कंटूले,दिलीपकाका राऊत,विजय कंटूले,एकनाथ चव्हाण, गणेश कंटूले,सलीम पठाण,रघुनाथ ताठे, प्रकाशराव सुरासे, अर्जुन शिंदे,तसेच सोळंके ज्ञानदेव मुख्याध्यापक शरदचंद्रजी पवार उच्च माध्यमिक विद्यालय कुंभार पिंपळगाव, रामेश्वर आर्दड मुख्याध्यापक देवी रेणूका माध्यमिक विद्यालय देवी दहेगाव,प्रदीप चव्हाण मुख्याध्यापक शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा कुंभार पिंपळगाव, विनायक कदम याची उपस्थिती होती
या शरद महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.यामध्ये जनकल्याण रक्तपेढी जालना व सूर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ कुं.पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले यात १८ जणांनी रक्तदान केले आहे तसेच कुं.पिंपळगाव व परिसरातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचात सदस्य यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र तौर यांच्या हस्ते पुष्पहार,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. शरदचंद्रजी पवार उच्च माध्यमिक विद्यालय कुं. पिंपळगाव,गोदावरी पब्लिक स्कूल कुं.पिंपळगाव व शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा कुं.पिंपळगाव या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आला,या चिमुकल्यांच्या बहरदार कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विनोद कऱ्हाडे यांनी केले, सूत्रसंचालन विजय काळे,कंटूले अंकिता,पवार अरुणा यांनी केले तर कार्यक्रमातील उपस्थित सर्वांचे आभार खिस्ते नीलकंठ यांनी मानले.