जांबसमर्थ येथे सूर्यनमस्कार प्रशिक्षण व ध्यान साधना शिबिर उत्साहात

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील
राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मंदिर परिसरात शुक्रवारी ( दि.१३) सकाळी नऊ ते बारा या वेळेत सूर्यनमस्कार प्रशिक्षण व ध्यान साधना शिबीर घेण्यात आले.
यावेळी योग शिक्षक शिल्पा शेलगावकर, अनिल महाजन, चंद्रकला चित्राल, उदय कहाळेकर, श्रीपाद कुलकर्णी, प्रल्हाद राहेगावकर, नारायण तिकांडे, समर्थ मंदिरांचे सहसचिव संजय तांगडे, राजकुमार वायदळ, मुख्याध्यापक भारत भुंबर , गजानन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान या शिबिरात जांबसमर्थ येथील शिवाजी विद्यालय आणि जि.प.प्रा. शाळेच्या विद्यार्थी आणि गावकर्यांसाठी आयोजित सूर्यनमस्कार प्रशिक्षण व ध्यान साधनेत, शाळेतील विद्यार्थी, गावकरी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन ध्यान साधनेचा आनंद घेतला.
अंबड (जि. जालना) येथे दि.२८ शनिवार रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धे करिता जालना येथील योग शिक्षक श्रीमती शिल्पा शेलगावकर, आणि श्री देवा चित्राल यांनी योगिक प्रार्थना, संगिताच्या तालावर नृत्य, योगिक हालचाली द्वारे शाळेतील शिक्षकांना सामिल केल्याने उपस्थितांचा आनंद द्विगुणित झाल्याने विद्यार्थांना मंत्रमुग्ध करुन सुक्ष्म व्यायाम घेऊन पूर्व तयारीचे वार्मअप करुन घेतले.
शास्त्रशुद्ध पद्धतीने १२ अंकाचा एक या प्रमाणे मंत्रोच्चाराने, कलात्मकरीत्या, श्वसनाच्या नियमानुसार सूर्यनमस्कार करुन घेतल्याने विद्यार्थ्यांचा शेवट पर्यंत उत्साह टिकवून राहिला. संभाजीनगरचे
श्री उदय कहाळेकर यांनी क्रीडा भारतीची ओळख करुन महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार कडून शिक्षण विभागाला आदेश काढून सूर्यनमस्कार चा प्रचार आणि प्रसार होण्या करिता केलेला संघर्ष वर्णन केला. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम
च्या अमृत महोत्सव वर्षास शुभेच्छा देऊन रथसप्तमी दिवशी सर्वांनी सूर्यनमस्कार करण्याचे आवाहन केले.
उदयजीं सोबत श्री श्रीपाद कुलकर्णी, श्री प्रल्हाद राहेगावकर यांनी उत्साह वाढविला. आशिया रेकॉर्ड केलेला श्री अनिल महाजन यांनी विविध प्रकारच्या टाळ्या, पक्षांचे आवाज, शिट्यांनी तारुणांना मंत्रमुग्ध केले. योग साधक श्रीमती चंद्रकला चित्राल आणि श्री नारयण तिकांडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेसाठी निवड केली. यावेळी किशोर मुनेमाणिक , रामेश्वर तांगडे, सचिन जोशी , मुंजाबा तांगडे, जगन देवकर, यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, व शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.