घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

तिर्थपुरी नगरपंचायतअंतर्गत शाळा,व प्राथमिक आरोग्य केंद्र दुरूस्तीच्या नावाखाली गैरव्यवहार

न्यूज जालना/प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी नगरपंचायतअंतर्गत शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र दुरूस्तीच्या नावाखाली नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या संगनमताने 27 लाख 64 हजार रूपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार शिवसेना नगरसेवकांनी 9 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. बोगस कामाचे बिंग फुटण्याच्या भितीने संबंधितांनी चार दिवसापासून येथील शाळेची दुरूस्ती व रंगरंगोटी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान शाळा व आरोग्य केंद्रात कागदोपत्री दुरूस्ती दाखवून लाखो रूपयांची बिले उचलण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप नगरसेवक प्रवीण कडूकर,रमेश बोबडे,सुनंदा चिमणे यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!