घनसावंगी तालुका

आजची तरुण पिढी अत्यंत दुर्दैवी
डॉ.केशव खटिंग
सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी


घनसांवगी
आत्ताच्या पिढीला संतांची परंपरा माहित नाही आजची पिढी ही अत्यंत दुर्दैवी आहे त्यांना पारावरच्या पोथ्या ,जत्रेतील तमाशा पाहिले नाहीत आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा सांस्कृतिक व साहित्यिक वारसा कसा जपायचा त्यापासून तरुण पिढी दूर जात आहे असे उदगार संत रामदास महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक 14 ते 28 जानेवारी 36 जिल्ह्याची36 व्याख्याने या कार्यक्रमात मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती या विषयावरील व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून दिनांक 18 रोजी बोलताना काढले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा आमदार शिवाजीराव चोथे आयुर्वेदाचार्य योगीराज कैलास महाराज प्राचार्य डॉ.राजेंद्र परदेशी डॉ. प्रल्हाद होंडे, देवनाथजी जाधव ,डॉ, शशिकांत पाटील डॉ, मारुती घुगे प्रा, भगवान मिरकड प्रा, अर्जुन डोईफोडे व्यासपीठावर उपस्थित होते

images (60)
images (60)


पुढे बोलताना केशव खटीग म्हणाले की आत्ताची पिढी दुर्दैवी असली तरीही ते मोबाईलच्या युगात भाग्यवान आहेत दुनियेची माहिती एका क्लिकवर पाहू शकतात त्यांनी जालना जिल्ह्याचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला लग्न जमले की तुम्ही मोबाईलवर बोलता पंधरा वर्षांपूर्वी हे सगळं एसटीडी वरून बोलले जायचे 25 वर्षांपूर्वी पत्र व्यवहाराने बोलले जायचे परंतु पंचवीस वर्षाच्या अगोदर ही कोणती सुविधा नसताना मायबापाच्या काळात काहीच नव्हती त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांचे लग्न जमले तेव्हा ते कसे बोलले असतील त्यांच्या काळात व्हाट्सअप फेसबुक नव्हते इतक्या वर्षाच्या काळात सर्व काम करून ते आजही एकमेकांना सोडून जेवत नाहीत त्यांचे खरे प्रेम आजही शिल्लक आहे यामुळे मी पहिली कविता आई बापावर केली
त्यांच्या ह्या कवितेने सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना गहिवरून आले कवितेचे नाव आहे

आस
आस लागली संसाराची मनी ग आण रानात राबतोय कुंबिनीचा धनी ग
सोळाव वरीस टळून गेलं माझ्या बापाने लगीन ठरल
दूर देशीचा कोण ग राजा
मन तर माझं तिथंच हरल
काळीज झालं मउ मऊ लोण्या वाणी ग
अन रानात राबतो कुणबीनिचा धनी ग
रानात माझा राजा राबतो संसाराच सपान बघतो
बांधावरच्या साळुंखी ला मलाच समजून काय काय बोलतो उडून जाईल मी बी चिमणी वाणी ग
अन रानात राबतो कुणबीनी चा धनी ग

लग्न झाल्यानंतर बापाला सोडावे लागते ही जाण मुलीला असते त्यांचे नाते वड व पारंब्या सारखे असते पारंबी वडाला कधीच सोडत नाही जमिनीत रुतते व पुन्हा वड निर्माण करते
तसे लेक सासरी गेल्यानंतर मूळ बाळ नातवंडे होतात पण मरेपर्यंत बापलेकी चे नाते हे घट्ट असते यासाठी या दोन शेवटच्या ओळी

मी तर बाई लाडाची होती पारंबी बाई वडाची होती
अंगा खांद्यावर खेळत त्यांच्या जन्मभराची त्यांची नव्हते
आताच वाटतं निखळ परक्यावानी ग
अन रानात राबवतो कुलबिणीचा धनी ग

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केला तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ शशिकांत पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मारुती घुगे यांनी केले तर आभार प्रा. अर्जुन डोईफोडे यांनी मानले यावेळी प्राध्यापक इतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!