घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

नगरपंचायत गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे उपोषण सुरु

न्यूज जालना/प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथील नगरपंचायत अंतर्गत शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती तसेच रस्ता दुरूस्तीच्या नावाखाली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आणि मुख्याधिकारी यांच्या संगणमताने २७ लाख ६४ हजार रूपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे ९ जानेवारी रोजी केली होती.
तक्रार करून पंधरा दिवस उलटून गेले तरी अद्याप ही प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेना नगरसेवक डॉ. प्रवीण कडूकर,रमेश बोबडे,सचिन चिमणे यांनी आज दि.२५ जानेवारी वार बुधवारपासून नगरपंचायत कार्यालयामोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.जो पर्यंत गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण करून दोषींवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुटणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!