घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

बेरोजगार तरूणांनी राजकारणाच्या मागे न लागता नोकरीकडे वळावेत-सतिष घाटगे

न्यूज जालना/कुलदीप पवार

images (60)
images (60)

गरीब ,होतकरू,बेरोजगार तरूणांनी राजकारणाच्या मागे न लागता नोकरीकडे वळावेत आजच्या स्पर्धेच्या युगात तरूणांनी स्पर्धा परीक्षाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजपाचे नेते सतिष घाटगे यांनी मंगळवारी (ता.२४) शाखा अनावरण प्रसंगी बोलताना केले.
तालुक्यातील जांबसमर्थ येथे भाजपा शाखेचे अनावरण श्री.घाटगे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सुनील आर्दड, अंकुशराव बोबडे,शिवाजी कंटुले, कैलाश शेळके, गणेश पघळ,राहुल कणके,रामेश्वर गरड,विकास शिंदे, पिराजी गायकवाड, विलास तांगडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना घाटगे म्हणाले की, आजच्या युगात बेरोजगार तरूणांची संख्या ही लक्षणीय असून उच्च शिक्षित तरूणांनी नोकरीकडे वळावेत.युवकांनी पंचायत समिती सदस्य न नव्हता गटविकास अधिकारी होण्याचे स्वप्न अंगी बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचार घराघरात पोहोचविणार असल्याचे घाटगे यांनी नमूद केले.
या शाखा कार्यकारीणीत मोहन तांगडे, लक्ष्मण देवकर, नारायण वायदळ,गौरव तांगडे, नारायण राऊत, सुदाम गायकवाड, अविनाश चव्हाण, अतिष तांगडे, ज्ञानेश्वर तांगडे, विशाल तांगडे, राम देवकर, राहुल तांगडे,दिपक तांगडे, किशोर देवकर, किरण तांगडे, परमेश्वर देवकर, सतिष तांगडे,प्रशांत वायदळ, जीवन तांगडे, विकास तांगडे, संभाजी तांगडे, गणेश तांगडे, अजिंक्य तांगडे, मोहन तांगडे, उदित वरकड, पवन आर्दड, हरीभाऊ वायदळ, महेश दक्षे,आदित्य आर्दड, माउली तांगडे, प्रभाकर तांगडे, एकनाथ तांगडे यांचा समावेश आहे. तसेच पंढरीनाथ वायदळ,लहू नाटकर,गणेश ढवळे,विष्णूपंत धांडगे,हनुमान तांगडे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!