घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

श्रीपत धामणगाव येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव:प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील श्रीपत धामणगाव येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दि.२५ फेब्रुवारीपासून अखंड हरीनाम तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ होत आहे.

शनिवारी (ता.२५) रोजी ह.भ.प.गजानन महाराज शास्री,रविवारी (ता.२६) रोजी ह.भ.प.सिताराम महाराज रोडगे,सोमवारी (ता.२७) रोजी ह.भ.प.आचार्य चैतन्य महाराज,मंगळवारी (ता.२८) रोजी ह.भ.प.रामायणाचार्य रामराव महाराज ढोक,बुधवारी (ता.१) रोजी ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले,गुरुवारी (ता.२) रोजी ह.भ.प.छगण महाराज खडके,शुक्रवारी (ता.३) रोजी ह.भ.प.रुपालीताई सवणे यांचे हरीकिर्तन होणार आहे. तर शनिवार (दि ४) रोजी सकाळी ह.भ.प.बालाजी महाराज पठाडे यांच्या काल्याचे किर्तन होणार असून महाप्रसाद वाटपाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

सप्ताह कालवधीत पहाटे दैनंदिन काकडा आरती,विष्णूसहस्रनाम,ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन,भागवत कथा,हरीपाठ, हरीकिर्तन,हरीजागर होणार असल्याचे ग्रामस्थ व संयोजक समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!