घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
देवीदहेगाव येथील शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील देवीदहेगाव येथील देवी रेणुका माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.व इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थींनीना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा किरणताई रविंद्र तौर,मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण,रामेश्वर आर्दड, यांची उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.