घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

विरेगव्हाण तांडा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

कुलदीप पवार/कुंभार पिंपळगाव

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथे सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाची सोमवारी (ता.१७) उत्साहात सांगता झाली.यानिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.विष्णू महाराज आनंदे यांच्या अमृतुल्य वाणीतून काल्याच्या किर्तन झाले. किर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
विरेगव्हाण तांडा येथील हनुमान मंदिर प्रांगणात दि.१० पासून अखंड हरीनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.महाराजांनी सोमवारी झालेल्या काल्याच्या किर्तनाचे महत्त्व विशद करीत श्रीकृष्ण लीलांचे वर्णन केले.जगदगुरू तुकाराम महाराजांचे विचार तसेच गाथा सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानाची आहे. संत देवाची कार्य करून दाखवतात आणि भक्तांना भक्तीची वाट दाखवतात.मनुष्य जीवनात देव,संत,आणि जीव असे तीन वर्ग आहेत. देवाला बोलवले तर देव धावून येतो.मनुष्य देहाला मागच्या जन्मीं केलेल्या कर्माचा फळ भोगण्यासाठी जन्माला यावं लागत.जेथे हरीनामाचा जयघोष होतो.तेथे काला होतो.संत सानिध्यात राहून जीव आणि देवाचा जेव्हा संगम होतो त्याला काला म्हणतात. परमार्थ, ब्रम्हज्ञान प्राप्तीसाठी अधिकारी असावा लागतो. अधिकाऱ्यालाच प्रसाद मिळत असतो.मानव देहाला एकदा काला भेटला तर जीवन पूर्ण होतो.देवाचा बाह्य रंग न पाहता अंतरंग ओळखला पाहिजे.देवावर प्रेम केलात तर देव आपल्याकडे धावून येईल.असे आनंदे महाराज यांनी निरूपण करताना सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त,महिला, आबालवृद्ध,आदींची वर्दळ वाढली होती.भाविक भक्तांनी परीसर गजबजून गेला होता. दररोज ग्रामस्थांसह भाविक भक्तांनी रामायण व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांसह युवक मंडळींनी परीश्रम घेतले.
यावेळी गायक, ,टाळकरी, पखवाज वादक,विणेकरी, महिला, पुरुष, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!