आजपासून कुंभार पिंपळगावात विविध धार्मिक कार्यक्रम
कुंभार पिंपळगाव-कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील विठ्ठल रूख्मिणी मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.२२ एप्रिलपासून अखंड हरीनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दररोज पहाटे सकाळी काकडा आरती,विष्णू सहस्रनाम,ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन,प्रवचन, हरीपाठ,हरीकिर्तन,जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (ता.२२) ह.भ.प.पांडुरंग महाराज आनंदे,रविवारी (ता.२३) ह.भ.प.नंदकिशोर महाराज जाधव,सोमवारी (ता.२४) ह.भ.प.लक्ष्मण महाराज क्षीरसागर, मंगळवारी (ता.२५) ह.भ.प.नारायण महाराज तनपुरे, बुधवारी (ता.२६) ह.भ.प.संभाजी महाराज काकडे,गुरूवारी (ता.२७) ह.भ.प.बद्री महाराज नवल,शुक्रवारी (ता.२८) ह.भ.प.श्रीहरी महाराज रसाळ यांचे किर्तन होणार आहे. तर शनिवारी (ता.२९) रोजी सकाळी दहा ते बारा यावेळेत ह.भ.प.सिताराम महाराज रोडगे यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद वाटपाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी आयोजित किर्तन श्रवण व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. देविदास म्हेत्रे,द्वारका म्हेत्रे,दिपक म्हेत्रे यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.