घनसावंगी बाजार समितीत राष्ट्रवादीचे १८ पैकी १८ विजयी
घनसावंगी उत्पन्न बाजार समिती
राष्ट्रवादीचा सर्वच १८ उमेदवार विजयी
राष्ट्रवादीची एकल हाती सत्ता
जालना :-
घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत कर्मयोगी अंकुशराव टोपे शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली असून त्यांचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी झाले आहेत. या संदर्भात वृत्त असे की घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गेल्या एक महिन्यापासून गाजत आहे.याचे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात असलेले समीकरण या ठिकाणी उलटे झाले आहे. ठाकरे गटामध्ये पडलेली फुट या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण यांनी भाजप सोबत युती केली. भाजपाचे माजी आमदार विलास बापू खरात व समृद्धी शुगरचे सतीश घाडगे,सुनील आर्दड व हिकमत उढाण हे युतीच्या बाजूने प्रचार करत होते तर महाविकास आघाडीच्या बाजूने आमदार तथा मा आरोग्यमंत्री राजेश टोपे व शिवसेनेचे अंबडचे माजी आमदार शिवाजीराव चोथे हे प्रचारात आघाडीवर होते. दरम्यान ही निवडणूक दि. २८ रोजी पार पडली.आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत.यामध्ये सेवा सहकारी सर्वसाधारण मतदारसंघातून गणेश राधाकिसन आर्दड, महादेव तुकाराम काळे, महेश राजेश्वरराव कोल्हे, तात्यासाहेब एकनाथ चिमणे, बद्रीनारायण त्रिंबक जाधव, बापूसाहेब वसंतराव देशमुख, दीपक भीमाशंकर शिवतारे यांचा समावेश आहे. तर सेवा सहकारी महिला राखीव मतदार संघातून कुशीवर्ता रामदास घोगरे व मीराबाई दत्तात्रय वराडे या विजयी झाल्या आहेत.सेवा सहकारी इतर मागास प्रवर्ग ओबीसी मतदारसंघातून सुभाष सुंदरराव गाडेकर यांनी बाजी मारली असून सेवा सहकारी भटक्या जाती जमाती मतदारसंघातून ज्ञानराज रामेश्वर भालेकर विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून जगन्नाथ बाबासाहेब काकडे व वसंत दामोदर भुतेकर यांनी बाजी मारली आहे तर ग्रामपंचायतच्या अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून अण्णासाहेब बापूराव साबळे विजयी ठरले आहेत.ग्रामपंचायतच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातून नकुल सिताराम भालेकर विजयी झाले आहेत तर व्यापारी मतदारसंघातून बाळासाहेब बापूसाहेब जाधव व दत्तात्रय शेषराव कंटुले हे विजयी झाले आहेत तर हमाल मापाडी मतदारसंघातून पठाण अजीमखां इमामखा हे विजयी झाले आहेत. असे सर्वच्या सर्व १८ उमेदवार हे महाविकास आघाडीच्या कर्मयोगी अंकुशराव टोपे पॅनलचे निवडून आले आहेत. दरम्यान आता सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहेत.