घनसावंगी विधानसभेची जागा (अजित पवारगट )राष्ट्रवादीचीच – इद्रिस नाईकवाडे
घनसावंगी प्रतिनिधी : घनसावंगीची विधानसभेची जागा ही अजित पवार राष्ट्रवादी गटाची असून ती जागाही अजित पवार गटालाच मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष केंद्रित नाईकवाडे यांनी घनसावंगी येथे आयोजित कार्यक्रमात केले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी दौऱ्या अंतर्गत घनसांगवी येथे अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इद्रिस नाईकवाडे हे होते सर प्रमूख पाहूणे म्हणून रविंद्र तौर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती जालना, शाह आलम खान जालना जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग , रविंद्र खरात, राज देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण कंटूले, राम घोगरे ग्रा.प.स.फिरोज कुरेशी, . अलीम पटेल, हैदर खान, फैयाज बागवान, भास्कर वराडे ,फेरोज पठाण, हारूण पठाण, चंद्रकांत कारके जालना जिल्हा कार्याध्यक्ष सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना मा. श्री. इद्रिस नाईकवाडे यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले असून ते निर्णय तुम्ही गावागावात जाऊन लोकांना सांगावे तसेच आपल्या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस च्या पाठीमागे खंबीपणे उभे रहावे व ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार निवडून आलेल्या आहे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून यामध्ये घनसावंगीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे त्यासाठी कार्यकर्ते कामाला लागावे असे आवाहन सुद्धा यावेळी त्यांनी केले.
त्यावेळी श्री.रविंद्र तौर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती जालना यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या हिताचे अनेक प्रश्न सोडवले असुन पुढील प्रश्न सोडविण्याचे काम दादा करणार आहे त्यासाठी मुस्लिम समाजाने दादांना ताकत द्यावी या साठी खंबीर पणे राष्ट्रवादी काँगेस पाठीमागे उभे राहावे व घनसावंगी तालुका राष्ट्रवादी काँगेसचा बालेकिल्ला असुन यावेळी पण ही जागा राष्ट्रवादीच लढविणार आणि जिंकणार असा ठाम विश्वास व्यक्त केला . त्यावेळी अनेक मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी आभार प्रदर्शन या कार्यक्रमाची सांगता झाली.