सचिन आहेर यांच्या माध्यमातून दुगलगावला अखेर पाणी मिळाले
नाशिक प्रतिनिधी :
येवला मार्केट कमिटीचे संचालक श्री सचिन आहेर यांची मध्यस्थी यशस्वी
येवला तालुक्यातील दुगलगाव या गावात पावसाळा संपला तरी पिण्याच्या पानाची तीव्र टंचाई होती पालखेड कालव्याला पाणी आलेले असताना मागील एक महिन्यापासून दुगलगाव येथील कोळगंगा नदीला पाणी सोडलेले नव्हते त्या संदर्भात वारंवार विनंती अर्ज करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती आज दुगलगाव येथील सर्व ग्रामस्थांनी मिळून पाटबंधारे कार्यालय येथेच संपर्क साधला व आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागे झाले व तत्काळ पाणी सोडले या कामी येवला मार्केट कमिटीचे संचालक श्री सचिन आहेर यांचे मोलाचे सहकार्य लाभले व ग्रामस्थांनी सचिन आहेर यांचे आभार मानले याप्रसंगी दुगलगाव येथील माजी उपसरपंच ज्ञानेश्वर निकम गणेश जगताप नितीन निकम अशोक भागवत यांच्यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते