मासेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये तालुकास्तरीय ग्रंथोत्सव उत्साहात साजरा
मासेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये तालुकास्तरीय ग्रंथोत्सव उत्साहात साजरा
: घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत रविवारी २२ सप्टेंबर २०२४ सकाळी ११ वाजता तालुकास्तरीय ग्रंथोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत विद्यार्थी, नागरिक व शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी महिलांनी पुढाकार घेतला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास अधिकारी दाभेराव, गट शिक्षणाधिकारी रवी जोशी, केंद्रप्रमुख आहे. बिराजदार आदी उपस्थित होते.
‘माझी शाळा, माझे योगदान’ या उपक्रमाअंतर्गत वाचनालयाची संकल्पना उदयास आली. महाराष्ट्रातील एकमेव गावातील महिलांनी गावांसाठी दिलेले ग्रंथालय आहे. यातील ग्रंथासाठी ४६००० फर्निचरसाठी ३०,००० रुपये लोकवर्गणी जमवली आहे.
शालेय समितीचे अशोकराव आनंदे, गंगाधर आनंदे, सरपंच, मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात जिरडगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित ससाने व चक्रधर उगले, लक्ष्मण लकडे यांनी भेट देऊन ग्रंथालयांची पाहणी केली आहे.
यावेळी मुख्याध्यापक पवार यांनी प्रास्ताविक व्यक्त केले.