पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु – आ. हिकमत उढाण

कुंभार पिंपळगाव :
प्रलंबित प्रश्ना संदर्भात विधानसभेमध्ये आवाज उठवू तसेच तालुक्यातही गरज पडेल तिथे पत्रकारांसाठी उभे राहू असे प्रतिपादन आ. हिकमत उढाण यांनी केले. नुकत्याच झालेल्या दर्पण दिनाचे औचित्य साधून घनसावंगी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक १९ जानेवारी दुपारी त्यांनी आयोजित केला होता.
त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक डॉ. प्रवीण कडुकर, मा. तालुकाप्रमुख उद्धव मरकड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पत्रकार बीडे पत्रकार मारुती सावंत यांनी भूमिका मांडल्या. यानंतर बोलताना आ. हिकमत उढाण म्हणाले की पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन झालेआहे. त्या महामंडळामार्फत पत्रकारांसाठी ज्या योजना येतील त्या राबवण्यावर भर देऊ, त्याचप्रमाणे घनसावंगी तालुक्यात मराठी पत्रकार भवन उभे करण्यासाठी जागा तसेच निधी उपलब्ध करून देण्यात येईल. २३ जानेवारी रोजी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून घनसावंगी तालुक्यातील सर्वपत्रकारांचाविमा उतरवण्यात येईल असे उद्धव मरकड यांनी सांगितले. याप्रसंगी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.