साकळगाव येथे गांजा शेती करणाऱ्या एक जणास पोलिसांनी घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा व घनसावंगी पोलीसांची कारवाई
जालना: जिल्हयात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा विक्री करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.

त्यानुषंगाने दिनांक 13/02/2025 रोजी गुप्त बातमीदार यांचे मार्फतीन माहिती मिळाली की, मौजे साकळगांव, ता. घनसावंगी, जि. जालना शिवारामधील शेतामध्ये इसम नामे भास्कर माणिक माने, रा. साकळगांव, ता. घनसावंगी, जि.जालना हा त्याचे शेतामध्ये मानवी आरोग्यास हानीकारक असलेला गांजाची शेती करुन स्वत :चे आर्थीक फायद्यासाठी गांजा विक्री करत आहे. मिळाले बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना व घनसावंगी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी मौजे साकळगांव, ता. घनसावंगी, जि. जालना येथे इसम नामे भास्कर माणिक माने, रा. साकळगांव, ता. घनसावंगी, जि. जालना याचे शेतावर छापा मारुन त्याच्या गट क्र. 125, साकळगांव शिवारामधील शेतामध्ये पाहणी केली असता इसम नामे भास्कर माणिक माने हा त्याचे शेतामध्ये गांजाचे एकुण 22 झाडांची लागवड करुन संवर्धन व जोपासना करीत असतांना मिळुन आला. त्यामुळे सदर गांजाची 22 झाडांचे पंचासमक्ष वजन केले असता ते 5 किलो 464 ग्रॅम असुन किंमत अंदाजे रु.54640/-असल्याचे दिसून आल्याने ते तपासकामी जप्त करण्यात आला असुन इसम नामे भास्कर माणिक माने, वय-55 वर्ष, रा. साकळगांव, ता. घनसावंगी, जि. जालना याचेविरुध्द पोलीस ठाणे घनसावंगी, जालना येथे सरकारतर्फ पोउपनि. राजेंद्र वाघ स्था.गु.शा. जालना यांचे फिर्यादीवरुन एन.डी.पी.एस. कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबड श्री. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, घनसावंगी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि. श्री. केतन राठोड, स्था.गु.शाचे अधिकारी पोउपनि. राजेंद्र वाघ, व सोबत स्थागुशाचे अमंलदार गोपाल गोशिक, फुलचंद गव्हाणे, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, देविदास भोजने, सतिश श्रीवास, संदिप चिचोले, तसेच घनसावंगी पोलीस ठाण्याचे अंमलदार रंजित वैराळ, सुनिल वैदय, प्रकाश पवार, धनाजी गवळे, गंगाराम कदम इत्यादींनी केली आहे.