चोरटे सीसीटीव्हीत कैद;कुंभार पिंपळगाव येथे चार दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दोन लाखांची चोरी

कुंभार पिंपळगाव :
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटाने कुंभार पिंपळगाव येथील आरगडे गव्हाण चौफुली जवळील चार दुकानाचे टॉबीच्या साह्याने शटरचे कुलूप तोडून दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष दोन दुकानातून मोटर भरणारे वायर(कॉपर) चोरी गेल्याची बाब समोर आले आहे.तर दोन दुकानात शटरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला गेला आहे .


तर रात्री पोलिस गस्त असताना मुख्य रस्त्यावर असलेल्या दोन दुकानात चोरी झालीच कशी असा प्रश्न आता ग्रामस्थांतुन विचारला जात आहे.
कुंभार पिंपळगाव येथील इब्राहिम शेख यांचे
न्यू जनता वेल्डिंग वर्क्सशॉप मध्ये टाबीच्या साह्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला
वेल्डींग केबल 30 मीटर , एक कटर, स्क्रॅप बुश असा अंदाजे लाख रुपयाचा मुद्धेमाल लंपास केला आहे तर काही अंतरावर असलेल्या दुसरे ज्ञानेश्वर बांगर यांचे माऊली मोटर रिवाइंडिंगचे दुकानाचा कोंडा तोडुन मोटर भरणारे (कॉपर)वायर चोरी केले आहे . अरगडे गव्हाण चौफुली येथील नाना काका कृषी सेवा केंद्राचे शटर चे कुलूप तोडून काही रोख रक्कम व औषधीच्या काही बाटल्या चोरी केली आहे. तर समर्थ सोलर सर्व्हिसेस चे दुकान फोडून चोरीचा प्रयत्न केला अश्या चार दुकाना फोडून चोरट्याने दोन लाखाचा मुद्धेमाल लंपास केला आहे . याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल घुगासे यांनी येऊन घटनास्थळाची पाहणी केली .
आजूबाजूच्या सीसीटीव्ही चेक केल्याने त्यात तीन चोरटे दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे .याबाबत पोलीस चोरट्यांचा तपास पोलीस करत असल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात यांनी सांगितले आहे.

एक कुलुप लंपास करणारी टोळी :
चार दुकानांपैकी तीन दुकानाचे शटरचे कुलूप चोरट्यांनी तोडून सोबत नेले असल्याचे समोर आले आहे.
