जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश

अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी

जालना : जिल्ह्यात आगामी सण, उत्सव, जयंती आणि पुण्यतिथींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश संपूर्ण जालना जिल्ह्यासाठी लागू राहणार आहेत.

येथे जाहिरात द्या न्यूज जालना प्रतिनिधी भरती व्यवसायाची जाहिरात दिगंबर गुजर न्यूज जालना

२१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी, २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन आणि २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले पुण्यतिथी साजरी होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि मिरवणुका आयोजित होण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षणाच्या मागण्या, आरक्षण बचाव, दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने, मोर्चे, निदर्शने व रास्तारोको होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

आदेशानुसार, शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, तलवारी, भाले, चाकू तसेच शरीरास इजा पोहोचविणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. दगड किंवा इतर घातक वस्तू जमा करून ठेवणे, तसेच भावना दुखावणारी भाषणे, गाणी, वाद्य वाजविणे, आक्षेपार्ह अंगविक्षेप किंवा विडंबनात्मक कृती करण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे.

याशिवाय, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच सभा, मिरवणुका आणि मोर्चे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, विवाह समारंभ, अंत्ययात्रा तसेच पोलीस अधीक्षक जालना आणि संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका व मोर्चांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

सदर आदेश संपूर्ण जालना जिल्ह्यात लागू राहणार असून, नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

NEWS JALNA — एकूण बातमी पृष्ठ भेटी1,100,144
बातमीचे वर्तमानपत्र स्वरूप
NEWS JALNA
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

जालना जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश

अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी

जालना : जिल्ह्यात आगामी सण, उत्सव, जयंती आणि पुण्यतिथींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश संपूर्ण जालना जिल्ह्यासाठी लागू राहणार आहेत.

२१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी, २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन आणि २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले पुण्यतिथी साजरी होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि मिरवणुका आयोजित होण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षणाच्या मागण्या, आरक्षण बचाव, दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने, मोर्चे, निदर्शने व रास्तारोको होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

आदेशानुसार, शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, तलवारी, भाले, चाकू तसेच शरीरास इजा पोहोचविणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. दगड किंवा इतर घातक वस्तू जमा करून ठेवणे, तसेच भावना दुखावणारी भाषणे, गाणी, वाद्य वाजविणे, आक्षेपार्ह अंगविक्षेप किंवा विडंबनात्मक कृती करण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे.

याशिवाय, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच सभा, मिरवणुका आणि मोर्चे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, विवाह समारंभ, अंत्ययात्रा तसेच पोलीस अधीक्षक जालना आणि संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका व मोर्चांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

सदर आदेश संपूर्ण जालना जिल्ह्यात लागू राहणार असून, नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद • newsjalna.com

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!