जालना जिल्हा

जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज मागविले

इच्छुक संस्थांच्या प्रतिनिधींना ४ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जालना : अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी तसेच स्थानिक स्तरावरील समस्या सोडविण्याच्या उद्देशाने जालना जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीवर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजासाठी कार्य करणाऱ्या तीन नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

येथे जाहिरात द्या न्यूज जालना प्रतिनिधी भरती व्यवसायाची जाहिरात दिगंबर गुजर न्यूज जालना

शासन निर्णय दिनांक १५ एप्रिल २०१७ आणि १९ जानेवारी २०२६ अन्वये ही समिती गठीत करण्यात येत आहे. समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशनासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या इच्छुक प्रतिनिधींनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, व्यवसाय, शैक्षणिक पात्रता, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची सविस्तर माहिती नमूद करावी.

इच्छुकांनी आपले परिपूर्ण अर्ज ४ डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

NEWS JALNA — एकूण बातमी पृष्ठ भेटी1,100,139
बातमीचे वर्तमानपत्र स्वरूप
NEWS JALNA
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज मागविले

इच्छुक संस्थांच्या प्रतिनिधींना ४ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जालना : अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी तसेच स्थानिक स्तरावरील समस्या सोडविण्याच्या उद्देशाने जालना जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीवर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजासाठी कार्य करणाऱ्या तीन नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शासन निर्णय दिनांक १५ एप्रिल २०१७ आणि १९ जानेवारी २०२६ अन्वये ही समिती गठीत करण्यात येत आहे. समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशनासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या इच्छुक प्रतिनिधींनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, व्यवसाय, शैक्षणिक पात्रता, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची सविस्तर माहिती नमूद करावी.

इच्छुकांनी आपले परिपूर्ण अर्ज ४ डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद • newsjalna.com

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!