जालना जिल्हा

सराफनगरमध्ये आ. कैलाश गोरंट्याल यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे उद्घाटन

सराफनगरमध्ये आ. कैलाश गोरंट्याल यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे उद्घाटन
नगरसेवक महाविर ढक्का यांच्या कॉलनी वासीयांतर्फे सत्कार
जालना (प्रतिनिधी) ः जुना जालना भागातील प्रभाग क्र. 23 सराफनगरमध्ये आ. कैलास गोरंट्याल यांच्या शुभहस्ते आज रविवारी सकाळी सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आश्‍वासनाची पुर्तता केल्याबदद्दल प्रभागाचे नगरसेवक महाविर ढक्का यांच्या कॉलनीवासीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सराफनगर भागातील रहिवासी राजेश खिस्ते, सौदागर शिवासेठ, सागर ढक्का, चव्हाण कुलकर्णी, पुरानी, आनंद खरात, पारट, विष्ण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सराफनगरमध्ये
प्रभागाचे नगरसेवक महाविर ढक्का यावेळी बोलतांना म्हणाले की, प्रभाग क्रं. 23 चा या विकास कामांमुळे चेहरामोहरा बदलेल. तसेच डबलजीन भागातील बालाजी मंदिर ते काळुंकामाता मंदिर या मार्गावरील सिमेट रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे ढक्का यांनी सांगितले. प्रभागात विविध विकास कामांचे भुमिपुजन केल्यामुळे  ढक्का यांचा नागरिकानी सत्कार केला.

images (60)
images (60)


जालना शहरातील सराफनगर, डबलजीन, विद्युत कॉलनी यासह या प्रभागातील विविध विकास कामे हे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पुढाकारातून होत असून या प्रभागातील सर्व कामे जलदगतीने पुर्ण होत आहेत. परंतू भाजपाच्या नगरसेविका आणि त्यांचे पती हे मात्र कागदोपत्री घोडे नाचविण्याचे काम करत असून या प्रभागातील लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत असल्याची टिका नगरसेवक महाविर ढक्का यांनी देठे यांचे नाव न घेता केली आहे.

भाजपाच्या नगरसेविकांचे काम फक्त
कागदोपत्री घोडे नाचविणे : ढक्का

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!