जालना जिल्हाजिल्हा गुन्हेगारी बातमीमहाराष्ट्र

विडिओ कॉलद्वारे बतावणी करून ९९ हजाराचा ऑनलाइन गंडा!

येथे जाहिरात द्या न्यूज जालना प्रतिनिधी भरती व्यवसायाची जाहिरात दिगंबर गुजर न्यूज जालना

जालना

घनसावंगी तालुक्यातील पाडूळी खुर्द येथे सायबर भामट्यांनी व्हिडिओ कॉल आणि ऑनलाइन कॉन्फरन्सचा आधार घेत तब्बल ९९ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाडूळी खुर्द येथील विष्णू दिगंबर नाईक (वय २८) यांच्याशी संबंधित या प्रकरणात सायबर भामट्यांनी प्रथम व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. आणि डिलिव्हरीचे पैसे साठी ऑनलाइन फार्म भरा नसता पेमेंट येणार नाही असे सांगितले , त्यानंतर आशा सेविका यांना ऑनलाइन कॉन्फरन्स आयोजित करून गावातील संबंधित महिलांचे फोटो व नावे सांगितले , तसेच आशा सेविका ,बाल विकास अधिकारी याचे देखील नावे सगीतयलाने आशा सेविकेचा देखील ओळख पटली . यावेळी तालुक्यातील आरोग्य, व शासकीय अधिकाऱ्यांची नावे सांगून विश्वास संपादन करण्यात आला. विशेष म्हणजे, गावातील प्रसूती झालेल्या महिलांची नावे सांगून भामट्यांनी संबंधित माहिती आपल्याकडे असल्याचे भासवले.

या माहितीमुळे समोरून बोलणाऱ्या व्यक्तींवर विश्वास बसल्यानंतर फोन-पेच्या माध्यमातून तब्बल ९९ हजार रुपये उकळण्यात आले आहे . याशिवाय गावांतीलच विकास अंकुश नाईक यांचेही सुमारे साडेतीन हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने गेल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष बाब म्हणजे, गावातील प्रसूती झालेल्या महिलांची माहिती सायबर भामट्यांकडे असल्यामुळे संबंधित डेटा कुठून लीक झाला, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय यंत्रणेकडे असलेल्या महिलांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होत आहे का, याची चौकशी होण्याची गरज आहे.

या घटनेमुळे अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच शासकीय योजनांशी संबंधित कर्मचाऱ्यांनी अनोळखी व्हिडिओ कॉल, ऑनलाइन कॉन्फरन्स आणि पैशांची मागणी करणाऱ्या फोनपासून सावध राहण्याचे आवाहन घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे यांनी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सायबर भामट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

गावातील असंख्य महिलांना कॉल्स
गावात याबाबत अनेकांना कॉल आला असून महिला चे गोपीनिय माहिती लीक झाली आहे याबाबत सायबर crime गुम्हा दाखल करण्यात आला असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे.

ट्रॅक्टर च्या हप्त्याच्या पैशावर डला

ट्रॅक्टरच्या बँकेचा हप्ता साठी एक एक रुपया जोडून पैसे जमा केले होते परंतु ऑनलाइन फ्रॉउड मुळे मात्र नाइक यांचे मोठे नुकसान झाले आहे

NEWS JALNA — एकूण बातमी पृष्ठ भेटी1,100,140
बातमीचे वर्तमानपत्र स्वरूप
NEWS JALNA
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद • newsjalna.com

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!