महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या घनसावंगी तालुकाध्यक्षपदी किशोर शिंदे तर उपाध्यक्ष पदी गणेश ओझा यांची नियुक्ती.
सचिवपदी राजकुमार वायदळ यांची नियुक्ती
कुंभार पिंपळगाव /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या घनसावंगी तालुकाध्यक्षपदी किशोर शिंदे तर तालुका उपाध्यक्ष पदी गणेश ओझा यांची नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हा कार्यकारीणी सदस्यपदी अविनाश घोगरे याची नियुक्ती करण्यात आली.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे दि.22 रोजी गुरुवार रोजी जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये घनसावंगी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जाहीर केलेल्या कार्यकारिणीत तालूका सल्लागार विष्णूदास आर्दड, रामेश्वर लोया तर तालुका अध्यक्ष पदी किशोर शिंदे , उपाध्यक्ष गणेश ओझा, संभाजी कांबळे , तालुका कार्याध्यक्ष कौतिक घुमरे, गणेश लोंढे तर सचिव राजकुमार वायदळ, सहसचिव अभिषेक दुकानदार, कोषाध्यक्ष भागवत बोटे, सह कोषाध्यक्ष नवनाथ मोगरे, यांची तर अशोकओवळे, बाळासाहेब व्यवहारे , संतोष शिंदे, नितीन तौर, कुलदीप पवार यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या ध्येय धोरणाच्या अधीन राहून काम करावे असे नियुक्ती पत्रात नमूद आहे.
या नियुक्ती बद्दल शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे