आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात 40 लाखांचे प्लाझ्मा थोरपी यंत्र खात आहे धूळ
न्यूज जालना
एकीकडे राज्यात काही शहरात प्लाझ्मा थेरपीद्वारे कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार केले जात असले तरी दस्तुरखुद्द आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात या थेरपीद्वारे एकाही रुग्णाचे उपचार केले नसल्याचे समोर आले आहे.
जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा महिन्यापूर्वी ४० लाखांचे प्लाझ्मा संकलन यंत्र दाखल झाले आहे. जिल्ह्यात अनेक प्लाझ्मा डोनर देखील तयार आहेत. परंतु जिल्हा रुग्णालयाकडून अद्याप एकाही कोरोना बाधीत व्यक्तीसाठी ही थेरपी वापरण्यात आली नासल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात आम्ही अद्याप प्लाझ्मा थेरपी वापरली नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अर्चना भोसले यांनी सांगितले.
तर प्लाझ्मा थेरपी ही कोविड आजारावर उपयुक्त उपचार पद्धती नसल्याच्या सुचना आयसीएमआर ने दिल्याचे एका डाॅक्टरांनी सांगीतले. असे असले तरी या थेरपीसाठी गाजावाजा करीत आणलेले ४० लाखांचे यंत्र मात्र सध्या येथील ब्लड बॅंकेत धूळ खात आहे.