पोलीस उपाधीक्षक आणि निरीक्षकांना निलंबित करण्यासाठी भाग पाडणार ;विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
न्यूज जालना
दीड महिन्यापूर्वी दीपक हॉस्पिटल मध्ये पोलिसांनी शिवराज नारियलवाले या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण केली. हे प्रकरण आता पेटले असून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज या पीडित कार्यकर्त्याच्या घरी जाऊन भेट घेतली
प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
या प्रकरणाला जबाबदार असलेले पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना निलंबित करावे अशी मागणी पोलीस महानिरीक्षकाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोगलाईच्या काळात ज्याप्रमाणे मारहाण केली जायची तशी मारहाण या भाजप कार्यकर्त्याला केली असल्याचे ते म्हणाले. जर या दोघांना निलंबित केले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, राहुल लोणीकर, सुजित जोगास, आदि पदाधिकार्यांची उपस्थिती होती.