2018 चा पीकविमा द्या! नसता प्रहार रस्त्यावर उतरेल
जालना/ योगेश भोजने
जालना जिल्ह्यातील 2018 चा पीकविमा देण्यात यावा ह्या मागणीसाठी सोमवारी प्रहार संघटनेचेवतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात आले.मा. उच्च न्यायालयात आैरंगाबाद खंड पिठाच्या निकालानुसार मंजूर खरीप हंगाम 2018 – 2019 पीक विमा रक्कम एक आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश असून सुद्धा एक वर्ष पूर्ण होऊन अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली नाही.
प्रहार च्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी अद्यापही कोणतेही निर्णय घेतले गेले नाही.
लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा रक्कम वर्ग करण्यात यावी यासाठी सोमवारी
दि. 02/08/2021 वार सोमवार रोजी प्रहार पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी मा.केशव नेटके यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदनाद्वारे कळविण्यात आले. सध्याच्या कोरोना काळात आंदोलन करताना काही जिवित हानी झाली तर पुर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाची राहील असे सुचवण्यात आले.
यावेळी प्रहार जालना जिल्हाध्यक्ष मा.विदूर लाघडे, डॉ.अप्पासाहेब कदम (मा.कृषी सभापती) राजांबर मते, संदीप धुळे प्रहार जिल्हा सचिव जालना, बाळासाहेब काळवणे प्रहार युवा जिल्हाध्यक्ष जालना, आकाश थेटे प्रहार युवा तालुकाध्यक्ष अंबड, जुबेर पटेल प्रहार प्रसिद्धी प्रमुख जालना, सुभाष राखुंडे (कामगार आघाडी जालना), बाळराजे जगताप प्रहार तालुकाध्यक्ष परतूर, कैलास ओळेकर प्रहार युवा तालुकाध्यक्ष, सुनिल शिंदे प्रहार युवा तालुकाध्यक्ष परतूर नवनाथ वखरे, राधेश्याम काळवणे, बालु बोडखे, माऊली हुशे, सुरेश दशरथ इत्यादींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.