जालन्यात राष्ट्रीय लोकअदालतच्या माध्यमातून 12 जणांचे संसार फुलले !
जालना दि.5- उच्च न्यायालय, मुंबई व जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले, प्रमुख न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय जालना सतिष एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 ऑग्स्ट 2021 रोजी कौटुंबिक न्यायालय, जालना येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये दिवाणी व फौजदारी मिळून एकूण 171 प्रकरणे ठेवण्यात आले होते. त्यापैकी 28 प्रकरणात सन्मान जनक तडजोड होवून प्रकरणे निकाली काढण्यात आले त्यापैकी 2 प्रकरणे ई-लोकअदालतीद्वारे मिटविण्यात आली असून 12 प्रकरणातील जोडण्यानी परस्परांमधील वाद सामजस्याने मिटवून घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा संसार करण्यावा निर्णय घेतला आहे.
या न्यायालया मागील दोन ते तीन वर्षापासुन प्रलंबीत कौटुबिक वाद प्रकरणामुळे कुटूंब व्यवस्था विस्कळीत होवून लहान मुलांची हेळसांड होत होती. या न्यायालयातर्फे प्रकरणातील जोडप्यांचे योग्य ते समुपदेशन करुन त्यांच्या मनात दाम्पत्य जीवन, कुटूंब व्यवस्था, कुटूंबातील मुलांचे स्थान व त्यांचा आंनद याबाबत त्यांच्यात सकारात्मक भाव निर्माण करुन सामंजस्याने जोडपी नांदवयास गेली आहेत. त्याबद्दल कौटुबिंक न्यायालय, जालना तर्फे विवाह व कुटूंब व्यवस्था आनददायी व एकत्रित राहण्यासाठी घर कसे असावे ही सकारात्मक राबविण्यात येवून प्रशास्तिपत्रक देण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्साठी कौटुबिंक न्यायाधिश जालना सतिष एन.पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालनाचे सचिव आर बी पारवेकर, यांचे मार्गदर्शन केले तर पॅनल प्रमुख व 2 रे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती कांचन एस झंवर यांनी काम पाहिले तर पंच म्हणून ॲड भाग्यश्री कुलकर्णी आणि ॲड एस एस वंजारे यांनी काम पाहिले.
ॲड शारजा शेख, ॲड सय्यद मुदस्सर, ॲड राहुल चव्हाण, ॲड विकास पिसुरे, ॲड बी बी वीर, ॲड डी डी खरात, विवाह समुपदेशिका प्रतिभा काचेवार, यांनी तर न्यायालयीन कर्मचारी नरेंद्र वझरकर, प्रबंधक गंगाधर मिटकरी, लघुलेखक सौ. आशा दुसे, सुनिल साबळे, भास्कर तुरे, विनोद साळवे, रविकुमार सातपुते व अन्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित होते