पालकमंत्री राजेश टोपे यांचा जालना जिल्हा दौरा
जालना प्रतिनीधी :– राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांचा जालना जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता जालना येथुन खोडेपुरी ता.जि. जालना कडे प्रयाण, सकाळी 10.00 वाजता खोडेपुरी येथे आगमन व खोडेपुरी ते निपाणी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भुमीपुजन, सकाळी 11.00 वाजता डुकरीपिंप्रीकडे प्रयाण, सकाळी 11.30 वाजता डुकरी पिंप्री येथे आगमन विविध विकास कामांचे भुमीपुजन व उद्घाटन कार्यक्रम, दुपारी 1.30 वाजता भाटेपुरीकडे प्रयाण, दुपारी 2.00 वाजता भाटेपुरी येथे आगमन विविध विकास कामांचे भुमीपुजन व उद्घाटन कार्यक्रम व राखीव, दुपारी 3.30 वाजता पोकळवडगांवकडे प्रयाण, दुपारी 4.00 वाजता पोकळवडगांव येथे आगमन विविध विकास कामांचे भुमीपुजन व उद्घाटन कार्यक्रम, सायंकाळी 5.30 वाजता रेवगांव ता. जि. जालना येथे आगमन व विविध विकास कामांचा शुभारंभ. सोयीनुसार जालना प्रयाण व आगमन.
अशा प्रकारे दिवसभराचा पालक मंत्र्यांचा जालना जिल्ह्यातील दिवसभराचा दौरा राहणार आहे.