कुंभार पिंपळगावात उद्या समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराजांचे किर्तन
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे ६ नोव्हेंबरपासुन अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहानिमित्त मंगळवारी समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे सायंकाळी ९ ते ११ यावेळेत हरीकिर्तन होणार आहे. या सप्ताहाची सांगता शनिवारी होणार आहे.
या सप्ताह दरम्यान गावातून शोभायात्रा काढण्यात आली. तसेच ग्रंथदिंडीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रत्येक घरासमोर सडा टाकून रांगोळी काढण्यात आली. दिपावली,पाडवा,आणि भाऊबीज अशा त्रिवेणी संगमावर होत असलेल्या हरीनाम सप्ताहात यावर्षी राज्यभरातील नामवंत किर्तनकार ह.भ.प.रामेश्वर महाराज गुंड,गजानन महाराज सोळंके,यांची किर्तन झाले.
सोमवारी ज्ञानेश्वर महाराज तांबे,मंगळवारी निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, बुधवारी माऊली महाराज खडकवाडीकर,गुरूवारी समाधान महाराज भोजेकर,शुक्रवारी समाधान महाराज शर्मा यांचे हरीकिर्तन होणार आहे. तर १३ शनिवार रोजी सकाळी १०ते १२ यावेळेत ह.भ.प.त्र्यंबक महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.तरी परीसरातील भाविक भक्तांनी आयोजित किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे