मंठ्यात 18 लाखाच्या गांजासह 36 लाखाचा मुद्देमाल जप्त
नर्सरीच्या झाडाआडून गांजाची तस्करी करणारा ट्रक पकडला
मंठ्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह पथकाची कारवाई
मंठा प्रतिनिधी
आंध्रातुन गांजा घेऊन येणारा ट्रक आज सकाळी परभणी – मंठा रोडवरील कर्णावळ फाट्याजवळ पोलिसांनी पकडला. ट्रकमध्ये बाहेरून आणि पाठीमागून नर्सरीतील विविध झाडाची रोपे रचून ठेवण्यात आलेली होती.ट्रकची झडती घेतली असती नर्सरीतील रोपाखाली गांजाने भरलेले 12 पोती आढळून आली. हा गांजा अंदाजे तीन क्विंटल असून, तो अंदाजे 18 लाख रुपयांचा आहे. पोलिसांनी 18 लाखाचा गांजा, 12 लाखाचा ट्रक आणि 6 लाखाची नर्सरीची रोपे जप्त केली आहेत. याप्रकरणी भोकरदन तालुक्यातील दोन व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी 8 वाजल्यापासूनच पोलिसांनी सापळा रचला होता.त्या नुसार मंठा ते देवगाव पाटी दरम्यान कर्नाळा पाटीवर एक ट्रक उभा असल्याचे दिसला.प्रथमदर्शनी ता ट्रक मध्ये चिकू,चिंच, आशा प्रकारची मोठी झाडे ठेवली होती.या झाडाच्या आड 12 गोण्या मध्ये प्रत्येकी 12 -13 पुढे गांजाने भरलेली होती.या गांजाची मोजदाद पोलीस ठाण्यात इन कॅमेऱ्यात करण्यात आली.6 हजार रुपये क्विंटल प्रमाणे 3 क्विंटल 7 किलो 280 ग्राम,गांजा जप्त केला आहे.12 गोंन्यामध्ये148 पुडे निघाले आहेत.