जालना क्राईमजालना जिल्हा
उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेल्या महिलेचा मृत्यू,कालपासून मृत महिला उपोषणाला बसल्याचा नातेवाईकांचा दावा.

गायकवाड कुटुंबाचे 40 दिवसापासून उपोषण सुरू
जालना प्रतिनिधी:
जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर एका 90 वर्षीय उपोषणकर्त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय, कस्तुरबा गायकवाड असे या मयत महिलेच नाव असून, जमिनीच्या वादातून शिवीगाळ करणाऱ्या आयटीआय कॉलेजचे प्रिन्सिपल तसेच इतर दोन शिक्षकांवरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हे उपोषण सुरू होते , या उपोषणाला काल सहभागी झालेल्या कस्तुरबाबाई यांचा उपोषणस्थळी मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी म्हटलंय, तर दुसरिकडे प्रशासनाची अद्याप प्रतिक्रिया आली नाही.