जालना जिल्हा

जालना जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश पहा सविस्तर …

images (60)
images (60)

जालना जिल्ह्यात आपत्तीकालीन व दिशानिर्देश लागु जिल्हादंडाधिकारी यांचे निर्देश जारी

जालना दि. 9 :- आपत्‍तीव्‍यवस्‍थापन कायदा 2005, साथ रोग अधिनियम 1897, नुसार प्राप्‍त अधिकारान्‍वये तसेच शासनाच्‍या लागू केलेल्‍या आपत्कालीन उपाययोजना व दिशानिर्देशांच्‍या अधीन राहून जालना जिल्‍हयात खालील प्रमाणे आपत्कालीन उपाययोजना व दिशानिर्देश दिनांक 10 जानेवारी 2022 रोजी 12.00 वाजेपासुन नवीन आदेश निर्गमित लागू केले आहेत.
अ.क्र.

नागरीकांची हालचाल

  1. सकाळी 5.00 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत 05 किंवा 05 पेक्षा अधिक लोकांना जमावबंदी करण्यात येत आहे.
  2. रात्री 11.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल.

शासकीय कार्यालयातील उपस्थिती

  1. महत्‍वाच्‍या कामासाठी कार्यालयप्रमुखांच्‍या लेखी परवानगीशिवाय कार्यायालयात अभ्‍यांगतासबंदी राहील.
  2. कार्यालय प्रमुखांनी नागरिकांसाठी व्‍हीडीओ कॉनफरेंसींगची सुविधेची व्‍यवस्‍था करावी.
  3. शासकीय बैठकांकरिता ऑनलाईन व्ही.सी. सुविधेचा वापर करण्यात यावा. एकाच कॅम्पस किंवा मुख्यालयाबाहेरील येणा-या सर्व उपस्थितांसाठी VC द्वारे बैठकांचे आयोजन करावे.
  4. कार्यालय प्रमुखांच्‍या आवश्‍यकतेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्‍साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्‍यक्ष उपस्थित राहणा-या कर्मचा-यांची संख्‍या कमी करणे तसेच आवश्‍यकतेनुसार कार्यालयीन कामकाजाच्‍या वेळांमध्‍ये बदल करणे. या करीता कर्मचा-यांसाठी कामांच्‍या वेळांमध्‍ये बदलाचा विचार करु शकतील.
  5. सर्व शासकीय कार्यालयांध्ये कोविड अनुरूप वर्तन (CAB) चे अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित विभागप्रमुख/ कार्यालय प्रमुख यांनी करावी.
  6. कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायझर उपलब्ध ठेवण्यात यावे.

खाजगी कार्यालयातील उपस्थिती

  1. कार्यालय व्‍यवस्‍थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्‍साहन देत कामकाजाच्‍या वेळा कमी कराव्‍यात. कार्यालयात 50 टक्के पेक्षा जास्‍त कर्मचारी उपस्थित राहणार नाही याचीही दक्षता घ्‍यावी. तसेच कर्मचा-यांसाठी वेळांमध्‍ये बदल करण्‍याचाही विचार करावा.तसेच कार्यालय 24 तास सुरु ठेवुन टप्‍प्याटप्‍प्याने काम करण्‍याबाबतही विचार करावा. कार्यालयीन कामकाजाच्‍या वेळा असामान्‍य असतील आणि त्‍यासाठी प्रवास करणे अत्‍यावश्‍यक असेल तर अत्‍यावश्‍यक कामांसाठी ओळखपत्र दाखवुन परवानगी मिळवता येऊ शकेल. अशा प्रकारचा निर्णय घेतांना महिला कर्मचा-यांची सुरक्षतिता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील.
  2. कोविड-19 लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यानाच केवळ प्रवेश देण्यात यावा. तथापि ज्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण व्हावयाचे आहे त्यांना त्याकरिता प्रोत्साहन देण्यात यावे.
  3. कार्यालय व्‍यवस्‍थापनाने कार्यालयाध्ये कोविड अनुरूप वर्तन (CAB) चे अनुसरण योग्यरित्य होत असल्याची खातरजमा संबंधित कार्यालय व्यवस्थापनप्रमुख यांनी करावी.
  4. कार्यालय व्‍यवस्‍थापनाने सर्व कार्यालयाचे प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायझर उपलब्ध ठेवण्यात यावे.

विवाह सोहळे

कोविड अनुरूप वर्तन (CAB) चे पालन करून कमाल एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.

अंत्‍यसंस्‍कार व अंत्यविधी

कमाल एकूण 20 लोकांच्या मर्यादेत.

सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम इ. ठिकाणची गर्दीबाबत

कोविड अनुरूप वर्तन (CAB) चे पालन करून कमाल एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.

शाळाआणि महाविद्यालये कोचिंग क्लासेस

दिनांक 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत बंद असतील; तथापि :-

  1. संबंधित शैक्षणीक मंडळांकडुन इयत्ता 10 वी व 12 चे विद्यार्थ्‍यांसाठी राबवयाचे शैक्षणिक उपक्रम.
  2. प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्‍यापनाव्‍यतिरिक्‍त करावयाचे कामकाज.
  3. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग, तंत्र व उच्चशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षणविभाग, महिला व बालविकास विभागआणि अन्‍य वैधानिक प्राधिकरणांकडून राबविण्‍यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम.
  4. याशिवाय सदर विभागआणि वैधानिक प्राधिकारणांना अपवादात्‍म परिस्‍थीतीत करावयाच्या नियोजनाकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचेकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असेल.

स्विमिंग पूल, स्‍पा, वेलनेस सेंटर

पुढील आदेशापर्यंत बंद असतील.

केशकर्तनालयआणि ब्युटी सलून.

  1. सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची परवानगी राहील.
  2. दररोज रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सदर दुकाने बंद राहतील.
  3. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्‍या दुकानांमध्‍ये इतर सुविधा बंद राहतील.
  4. सदर केशकर्तनालयांनी कोविड अनुरूप वर्तन (CAB) चे पालन करणे बंधनकारक राहील. आणि सदर केशकर्तनालयव ब्युटी सलूनमधील सर्व कर्मचा-यांचे पुर्ण लसीकरण झालेले असणे आवश्‍यक आहे तसेच पूर्ण लसीकरण झालेल्‍या व्‍यक्‍तींनाच या सुविधा वापरता येतील.
  5. केशकर्तनालयआणि ब्युटी सलूनमध्‍ये केवळ त्‍याच गतीविधींना परवानगी असेल ज्‍यामध्‍ये कोणालाही मास्‍क काढण्‍याची गरज पडत नाही.

जिम (Gyms)

  1. सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची परवानगी राहील.
  2. सदर ठिकाणी कोणतीही कृती करतांना मास्‍कचा वापर बंधनकारक राहील.
  3. पूर्ण लसीकरण झालेल्‍या व्‍यक्‍तींनाच या सुविधा वापरता येतील.
  4. सर्व कर्मचा-यांचे पुर्ण लसीकरण झालेले असणे आवश्‍यक आहे.

क्रीडा स्पर्धात्‍मक कार्यक्रम

  1. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पूर्वनियोजित स्पर्धा खालील नियमांचे पालन करून सुरु राहतील.
  2. प्रेक्षकांना परवानगी नसेल.
  3. सर्व खेळाडू/स्टाफ करिता बायो-बबल असेल.
  4. सहभागी होणा-या सर्व आंतरराष्‍ट्रीय आणि राष्‍ट्रीय खेळाडुंसाठी भारत सरकारचे नियम लागू राहतील.
  5. सर्व खेळाडू/स्टाफचे दर तीन दिवसाने आरटीपीसीआर/रॅट चाचणी करणे बंधनकारक असेल.
  6. शहर किंवा जिल्हास्तरावरील खेळांच्‍या शिबीरांना, स्‍पर्धांना, कार्यक्रमांच्‍या आयोजनास बंदी असेल.

एन्‍टरटेनमेंट पार्क, प्राणिसंग्रहालये, वस्‍तुसंग्रहालये, किल्‍ले आणि अन्‍य सशुल्‍क ठिकाणे, नागरीकांसाठीचे कार्यक्रम, स्‍थानिक पर्यटन स्‍थळे.

पुढील आदेशापर्यंत बंद असतील.

  1. सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर आस्‍थापनांची एकूण क्षमता आणि उपस्थित ग्राहकांची संख्या प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्डवर सर्वांना स्‍पष्‍ट दिसेल अशा ठळक पद्धतीने दर्शविण्‍यात यावी.
  2. सर्व आगंतुक आणि कर्मचारी कोविड अनुरूप वर्तन (CAB) चे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घेण्‍यासाठी व्‍यवस्‍थापनाने मार्शल्‍स नेमावेत.
  3. सदर ठिकाणी कोविड-19 रॅपीड एन्‍टीजेन चाचणी करिता बुथ/किऑस्क.
  4. पुर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे.
  5. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद.

रेस्टॉरंट, उपहारगृहे

  1. सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर आस्‍थापनांची एकूण क्षमता आणि उपस्थित ग्राहकांची संख्या प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्डवर सर्वांना स्‍पष्‍टदिसेल अशा ठळक पद्धतीने दर्शविण्‍यात यावी.
  2. पुर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा.
  3. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद.
  4. सर्व दिवशी पार्सल सुविधा/होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल.

नाट्यगृह/चित्रपटगृहे

  1. सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर आस्‍थापनांची एकूण क्षमता आणि उपस्थित ग्राहकांची संख्या प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्डवर सर्वांना स्‍पष्‍टदिसेल अशा ठळक पद्धतीने दर्शविण्‍यात यावा.
  2. पुर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे.
  3. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद.

आंतरराष्ट्रीय प्रवास

भारत सरकारच्‍या निर्देशांप्रमाणे.

देशांतर्गत प्रवास

कोविडलसीचे दोन्‍ही मात्रा पुर्ण झालेले किंवा राज्‍यात प्रवेश करण्‍याआधी 72 तासा पुर्वी पर्यंतचे आर.टी.पी.सी.आर चाचणीचा निगेटिव्‍ह अहवाल ग्राहय धरण्‍यात येईल. हे हवाई, रेल्‍वे आणि रस्‍ते या तीन्‍ही मार्गांनी प्रवास करणा-या प्रवाश्‍यांना लागू राहील. प्रवास करणारे वाहन चालक, वाहक आणि अन्‍य सहयोगी कर्मचा-यांनाही हे लागू राहील.

कार्गो ट्रान्‍सपोर्ट, औद्योगीक उपक्रम, बांधकाम उपक्रम

पूर्ण लसीकरण झालेल्‍या व्‍यक्‍तींकडून सुरु राहील.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

पूर्ण लसीकरण झालेल्‍या व्‍यक्‍तींसाठी, नियमीत वेळांनुसार सुरु राहील.

केंद्रीय लोकसेवा आयोग/राज्य लोकसेवा आयोग/वैधानिक संस्था/सार्वजनिक संस्था इ.द्वारे घेतल्‍या जाणा-या परिक्षा

  1. राष्‍ट्रीय पातळीवर घेतल्‍या जाणा-या परिक्षा, भारत सरकारच्‍या मार्गदर्शक सुचनांनूसार पार पाडल्‍या जातील. अशा परिक्षांसाठीचे प्रवेश पत्र यासाठीच्‍या प्रवासाची अत्‍यावश्‍यकता सिध्‍द करण्‍यास पुरेसे असेल.
  2. राज्‍य पातळीवर घेण्‍यात येणा-या परिक्षा ज्‍यांच्‍यासाठीची प्रवेश पत्रे आधीच निर्गमित झालेली आहेत किंवा ज्‍यांचा तारखा आधीच निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत त्‍या अधिसुचनेनुसार पार पडतील. अन्‍य सर्व परिक्षा राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्‍या मंजुरीनंतरच पार पाडल्‍या जातील.
  3. कोविड अनुरूप वर्तन (CAB) चे काटेकोर पालन करून परिक्षांचे संचालन करावे. जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण यासाठी निरिक्षक नेमतील.
  4. प्रवासासाठी अत्‍यावश्‍यक वैधकारणेः-
    1. वैद्यकीय अत्‍यावश्‍कता.
    2. अत्‍यावश्‍यक सेवा (अत्‍यावश्‍यक सेवांची यादी सदर आदेशासह सलंग्‍नीतपरिशिष्‍ट-1 नुसार)
    3. विमानतळ, रेल्‍वेस्‍थानक, बस स्‍थानक येथे जाणे किंवा येणेसाठी वैध तिकिटांसह.
    4. 24 तास सुरु राहणा-या कार्यालयांसाठी, विविध शिफ्टमध्‍ये काम करण्‍यासाठी तेथील कर्मचा-यांचा प्रवास
    अत्‍यावश्‍यक मानला जाईल.
  5. कोविड अनुरूप वर्तन (CAB) च्‍या तरतुदी सदर आदेशासह सलंग्‍नीत परिशिष्‍ट-2 प्रमाणे असेल.
  6. दुकाने, रेस्‍टॉरंटस, हॉटेल्‍स, ई-कॉमर्सकिंवा होम डिलीव्‍हरी करणा-या आस्‍थापनेतील सर्व कर्मचा-यांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक राहील. यासाठी संबंधीत व्‍यवस्‍थापनाला जबाबदार धरण्‍यात येईल आणि यासाठी आवश्‍यक बाबींची पुर्तता न केल्‍याचे आढल्‍यास सदर आस्‍थापना जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणांकडून बंद करण्‍यात येईल. या कामात सहभागी असलेल्‍या कर्मचा-यांची नियमीत वेळानंतर सदर आस्‍थापनेने रॅपीड एन्‍टीजेन टेस्‍ट करून घेणे गरजेची आहे.
  7. कमी लसीकरण झालेल्‍या जिल्‍ह्यांमध्‍ये स्‍वतंत्रपणे वाढीव बंधनेही लागू करता येवु शकतील.
  8. जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण या बंधनांमध्‍ये बदल करण्‍याबाबत राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाला सुचवू शकेल. असे बदल राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्र‍ाधिकरणाच्‍या पुर्व परवानगीनेच लागू करण्‍यात येतील.
  9. कोविड व्‍यवस्‍थापनाच्‍या कामासाठी राज्‍य सरकारची कार्यालये किंवा राज्‍य सरकारद्वारे अर्थसहाय्य‍ित अन्‍य संस्‍थांचे कर्मचारी आणि संसाधने यांचे अधिग्रहण करण्‍याचे संपूर्ण अधिकार जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाला राहतील.

उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्याससंबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग अधिनियम आणि भारतीय दंडसंहिता, 1860 मधील तरतूदीनुसार व वर नमुद केल्‍याप्रमाणे कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हादंडाधिकरी अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जालना यांनी आदेशीत केले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!