मासेगाव:आठवड्यातील सहा वार परिवार आणि झाडांसाठी शनिवार
जालना प्रतिनिधी
जीवनवृक्षच्या टीमच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्यातील मासेगाव तळ्यातील मारोती मंदिर परिसर भागात वृक्ष संवर्धन व संगोपनची मोहीम सुरू झाली आहे मागील दहा महिन्यापासून जीवनवृक्षच्या टीमच्याच्या 200 च्या आसपास असलेल्या सदस्यांनी ही मोहीम सुरू केली आहे जीवनवृक्षच्या टीमच्या माध्यमातून आठवड्यातील सहा वार परिवार आणि झाडांसाठी शनिवार ह्या टॅगलाइनच्या माध्यमातून झाडाचे संगोपन चालू आहे
यात दर शनिवारी टीम मधील सदस्य आलटून पालटून येउन झाडांना पाणी देणे, निगा घेणे असे कामे मागील दहा महिन्यापासून अविरत करत आहे यातच आता माळरान खडकावर दोन हजारांच्यावर झाडे लावण्यात आल्याने माळरान आता हिरवाईने नटू लागले आहे घनसांवगी तालुक्यातील मासेगाव येथील तळ्यातील मारुती परिसरातील खडकाळ माळरानावर विविध प्रकारची झाडे लावून परिसर वनराईने फुलविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे . गाव व परिसरातील नागरिकांनी एकत्रित केलेल्या कामामुळे आज या भागात अनेक झाडांसह फुलझाडे बहरली आहेत . मासेगाव येथील तळ्यातल्या मारुती परिसरात माळरान आहे . या भागातील मासेगावसह कुंभार पिंपळगाव , पाडोळी , देव हिवरा येथील दहा ते पंधरा जणांनी एकत्रित येवून २५ एकराच्या खडकाळ जमिनीवर मातीची आळे करून वनराई फुलविली आहे .
यात २४ एकरावर वडाची , पिंपळाची तर एका एकरावर विविध जातीची फुलझाडे फुलली आहेत . स्वयंसेवकांचा उपक्रम पाहून समस्त महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई यांनी दोनशे वडाची झाडे दिली आहेत . एका एकरावर देवराई नावाने प्रकल्प हाती घेऊन त्यात कुटुंब पद्धतीने एका प्रकारचे चार अशी ४०० प्रकारची फुल ,झुडूप, फळाची झाडे लावण्यात आली आहेत . यात औषधी वनस्पती काटे सावर , ताबर , शिवंन ताळ , पिंपळ , वड . तरू , खजूर , फूल वेली अशा पशुपक्षींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेली , झाडांचा समावेश आहे .काही ठिकाणी खड्डे खोदून त्यामध्ये काळी माती टाकून आळे तयार करून त्यामध्ये १७० वडाची झाडे लावण्यात आली आहेत . त्यासाठी एका झाडाला एक ब्रास काळी माती या प्रमाण २००० हजार ट्रॅक्टर काळी माती आणण्यात आली . सार्वजनिक वर्गणीतुन झाडाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन उपलब्ध करून देण्यात आले आहे . शिवाय इतर अनेक दानशुरांनीही या उपक्रमासाठी मदत केली आहे .
सर्वांच्या प्रयत्नातून या भागातील माळरान आता हिरवाईने नटू लागले आहे .तळ्यातील मारोती मंदिर हे जागृत देवस्थान असून ह भ प बळीराम महाराज मागाडे देवस्थानचे अध्यक्ष हे मंदिराचे काम पाहत आहेत दररोजयाठिकाणी तालुक्यासह अनेक गावांतून नागरिक देवदर्शनासाठी येत असतात झाडांचे सवर्धन व वृक्षारोपण पाहून मन प्रसन्न होत आहेत ह्या यात नारायण देवकते ,प्रकाश आनंदे, सुभाष जगताप, अंगद सिरसाट, सोपान आनंदे, पंढरीनाथ आनंदे, शरद वराडे, विष्णू आनंदे, महादेव मते, कटू पटेल, सुनील उगले, भागवत उगले, छत्रभुज आनंदे, उद्धव बाप्पा आनंदे, गंगाधर आनंदे, शाम आनंदे,गोवर्धन बोडखे,श्रहरि आनंदे, शिवाजी आनंदे, भगवान आनंदे, कांती राम आनंदे, रंगनाथ आनंदे ,सतराम आनंदे यांच्यासह अनेकांची ह्या यामध्ये सहभाग आहे