महाराष्ट्र न्यूजराजकारण

वंचित’ बहुजन आगाडीने जाहीर केली ११ उमेदवारांची नावे

images (60)
images (60)

: वंचित बहुजन आघाडीचे
अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या ११ उमेदवारांची नावे शनिवारी पत्रपरिषदेत जाहीर केली. यावेळी कोणत्याही पक्षाने मागितला तरी त्यांना पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अॅड. आंबेडकर यांनी भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी हे वंचितचे दोन सहयोगी पक्ष असतील अशी माहिती दिली आणि सुनील गायकवाड (भारत आदिवासी पार्टी) हे चोपडा मतदारसंघातून आणि हरीश उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) हे रामटेकमधून उमेदवार असतील असेही त्यांनी जाहीर केले. आणखी काही पक्ष लवकरच आपल्यासोबत येतील. आपला निवडणूक जाहीरनामा लवकरच जाहीर करू, असे ते म्हणाले

मतदारसंघ आणि वंचितचे उमेदवार

१) रावेर – शमिभा पाटील २) सिंदखेडराजा – सविता मुंढे ३) वाशिम – मेघा डोंगरे ४) धामणगाव रेल्वे नीलेश विश्वकर्मा ५) दक्षिण-पश्चिम – विनय भांगे ६) साकोली – डॉ. अविनाश नान्हे ७) दक्षिण नांदेड – फारुख अहमद ८) लोहा – शिवा नारंगले ९) छत्रपती संभाजीनगर पूर्व – विकास दांडगे १०) शेवगाव – किसन चव्हाण ११) खानापूर – संग्राम माने. हे उमेदवार उभा करणार आहे.तर तृतीयपंथी उमेदवार दिला

रावेरमधून उमेदवारी मिळालेले शमिभा पाटील तृतीयपंथी आहेत. काही बिगरराखीव मतदारसंघात त्यांनी राखीव जातींमधील उमेदवार दिले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!