मंठा तालुका

लिलावानंतरही वाळुघाट चालवणे अवघडच तक्रारी वाढल्या ; गुत्तेदारासह वाहनधारक त्रस्त

कारवाईऐवजी अवैधवसूलीवर भर

तळणी : पुर्णा नदीपात्रातील वाळुघाटाचा लिलावनंतरही स्थानिकांऐवजी इतरांच्या हस्तक्षेप व तक्रारी वाढल्यामुळे गुत्तेदाराना वाळुघाट चालविणे अवघड होऊन बसले. त्यातच काही विभागातील  अधिकारी- कर्मचारी रस्त्यावर येऊन कारवाईच्या नावाखाली वाळु वाहनधारकांची अडवणूक करीत अवैधवसूली करीत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. 

images (60)
images (60)

पुर्णा नदीपात्रातील आठ वाळूघाटाचे लिलाव झालेले असून या लिलावातून जिल्हा प्रशासनाला अंदाजे १८ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे . मंठा तालुक्यातील पुर्णा नदीपात्रातील आठ वाळूघाट ६ एजन्सीकडून लिलाव घेण्यात आले. लिलाव होऊन महिना उलटल्यानंतरही प्रशासनाकडून एकही ठोस कारवाई झाली नसल्याने संबंधित गुत्तेदार शासनाचे नियम, अटी व शर्तीच्या आधीन राहून वाळूचे उत्खनन व वाहतूक करीत आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एकंदरीत वाळु उत्खननप्रकरणी स्थानिकाऐवजी  इतरांकडून केवळ आर्थिक जडतोडीसाठी हस्तक्षेप व तक्रारी  वाढल्या आहेत. त्यातच महसूल व्यतिरिक्त इतर विभागातील अधिकारी – कर्मचारी रस्त्यावर येऊन कारवाईच्या नावाखाली वाळु वाहनधारकांची अडवणूक करुन अवैधवसूली करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 


कुणीही अडवतात वाहणे – मोटे

वाळुघाटावरुन राॅयल्टी घेतल्यानंतरही अनेकदा कोणीही वाहन थांबवून चौकशी करतात. मात्र, चौकशी करणारे अधिकारी – कर्मचारी बीना गणवेश , ओळखपत्र, खाजगी वाहनांचा आधार घेऊन तपासणी करतात. याशिवाय अनेकजन वाहन अडवून वेळ वाया घालवत वर्गणीसाठी अडवणूक करीत असल्याचे वाळुवाहतूकदार विष्णू मोटे यांनी सांगितले.

दर घसरले ; लूट सुरुच – आढाव

वाळुघाटावर ४ हजार ५०० रुपये एक राॅयल्टीसाठी आकारले जातात. मात्र, त्यानंतर काही किमी अंतरावर तीच वाळु ४ हजाराने वाळु खाली करावी लागत असल्याचे शंकर आढाव यांनी सागितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!