भाजपकडून उमेदवारी दिल्यास गुंज बु गणातून पंचायत समितीसाठी गोविंद शिंदे इच्छुक

जालना:
श्रीपत धामणगाव येथील रहिवासी आणि भाजयुमोमधील सक्रीय युवा कार्यकर्ते गोविंद शिंदे यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी आपली इच्छुकता व्यक्त केली आहे. शिंदे हे गेली वीस वर्षे लोकनेते मा. सुनिल बापू आर्दड यांच्यासोबत कार्यरत असून, त्यांचे खंदे सर्थक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
भाजयुमो शाखा अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष या पदांवर कार्य करताना त्यांनी संघटन बांधणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मतदारसंघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी शिंदे यांनी अनेक मोर्चे, आंदोलनं यामध्ये पुढाकार घेतला आहे.
ग्रामीण भागातील समस्यांवर सातत्याने आवाज उठवत त्यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला आहे.सन 2006 मध्ये सुनिल बापू आर्दड यांनी जिल्हा अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरपासूनच गोविंद शिंदे हे पक्षाशी एकनिष्ठ आहे. त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत स्थानिक युवकांमध्ये एकजूट निर्माण केली आहे.
त्यांच्या कार्याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतल्यास गुंज बु गणात शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गेल्या काही वर्षांत त्यांनी मतदारसंघातील विकासकामे, जलसंधारण उपक्रम आणि ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण यांसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
यामुळेच शिंदे यांचे नाव समर्थक कार्यकर्त्यांत लोकप्रिय ठरत आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास शिंदे यांच्या रूपाने युवा नेतृत्वाला संधी मिळेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे

